गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:25+5:302021-09-18T04:37:25+5:30
पीक पेऱ्याबाबत जनजागृती देऊळगाव मही : पाडळी शिंदे येथे नायब तहसीलदार राणे यांनी पीक पेऱ्याबाबत जनजागृती करून शेतकऱ्यांना येणाऱ्या ...
पीक पेऱ्याबाबत जनजागृती
देऊळगाव मही : पाडळी शिंदे येथे नायब तहसीलदार राणे यांनी पीक पेऱ्याबाबत जनजागृती करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन केले. त्यांनी १५ सप्टेंबर रोजी पाडळी शिंदे शिवारात जाऊन शेतकऱ्यांच्या पीक पेरा ऑनलाइन नोंदणीबाबतच्या समस्या सोडविल्या.
शासनस्तरावरून माझा पेरा मीच नोंदविणार ही संकल्पना सुरू केली आहे. हा पीक पेरा भरताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता देऊळगाव राजा तहसीलने पुढाकार घेऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना बांधावर जाऊन जनजागृती सुरू केली आहे. अंढेरा मंडलातील पाडळी शिंदे येथे नायब तहसीलदार विकास राणे यांनी आज १५ सप्टेंबर रोजी शेतकरी वर्गाच्या पीक पेरा नोंदणीबाबत अडचणी जाणून घेऊन त्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्यक्षात शेतात जाऊन पीक पेरा कसा भरावा ही माहिती दिली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक पेरा मोबाइल ॲपमधून शेतातून नोंदवावा, असे आवाहन नायब तहसीलदार राणे यांनी केले. यावेळी त्यांच्या सोबत मंडल अधिकारी पवार, तलाठी मदन जारवाल, रवींद्र शिंदे, भारत शिंदे, स्वप्निल शिंदे, रामेश्वर वायाळ, शिवशंकर शेळके, अंकुश वायाळ, पंढरी मिसाळ, विलास सोनपसारे, संजय सोनपसारे यांच्यासह इतरही शेतकरी उपस्थित होते.