आंतरजिल्हास्तरावरील दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:33 AM2021-03-20T04:33:40+5:302021-03-20T04:33:40+5:30

अैारंगाबाद पोलिसांनी १८ मार्च रोजी मासरूळ परिसरात ही कारवाई केली. यामध्ये त्यांनी शेखर उर्फ आण्णा प्रकाश दांडगे (२६, रा. ...

A gang of two-wheeler thieves on inter-district level | आंतरजिल्हास्तरावरील दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड

आंतरजिल्हास्तरावरील दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड

Next

अैारंगाबाद पोलिसांनी १८ मार्च रोजी मासरूळ परिसरात ही कारवाई केली. यामध्ये त्यांनी शेखर उर्फ आण्णा प्रकाश दांडगे (२६, रा. पिंपळगाव रेणुकाई, जि. जालना), विलास रामभाऊ कुऱ्हाडे (हिसोडा, जि. जालना) यांचे साथिदारांना ताब्यात घेतले आहे. सोबतच संबंधितांकडून २३ दुचाकी आणि ५ मोबाईल जप्त केले आहेत. सध्या या प्रकरणातील आठही आरोपी हे अैारंगाबाद जिल्ह्याील करमाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या आठ रोपींनी बुलडाणा-जालना जिल्हयाच्या सीमावर्ती गावांच्या परिसरात चोरी केलेल्या दुचाकींची विक्री केली अहो. पोलिसांच्या तपासात ही बाब स्पष्ट झाली आहे.

दुचाकी चोरट्यांचा छडा लावण्यसाठी अैारंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पोलिस उपनिरीक्षक संदीप सोळंके, पोलिस हेडकॉन्स्टेबल बालू पाथ्रीकर, नामदेव शिरसाठ, श्रीमंत भालेराव, राहूल पगारे, संजय भोसले, बाबासाहेब नवले, संजय तांदले, योगेश तरमळे यांनी ही कारवाई केली. दरम्यान पोलिसांच्या चौकशीत आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Web Title: A gang of two-wheeler thieves on inter-district level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.