देऊळगांवमही येथे कृषी पंप चोरणार्या टोळीस अटक; मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:32 AM2017-11-04T00:32:37+5:302017-11-04T00:33:14+5:30
देऊळगांवमही / अंढेरा: शेतकर्यांचे कृषी पंप चोरणार्या टोळीस एलसीबीच्या पथकाने २ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतली. त्यांच्याकडून २७ कृषी पंप व ९ स्प्रिंकलर नोझेल सेट स्टॅण्डसह ४ लाख १७ हजारांचा माल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगांवमही / अंढेरा: शेतकर्यांचे कृषी पंप चोरणार्या टोळीस एलसीबीच्या पथकाने २ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतली. त्यांच्याकडून २७ कृषी पंप व ९ स्प्रिंकलर नोझेल सेट स्टॅण्डसह ४ लाख १७ हजारांचा माल जप्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना, अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी.बी. सातपुते यांच्या नेतृत्वात पथकाने मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली. धोत्रानंदई फाट्याजवळ ते उभे असल्याचे समजताच पथकाने विठोबा उत्तम मुंढे, संदीप ऊर्फ गुड्डू चंद्रभान गायकवाड (दोघे रा.सरंबा फाटा, मंडपगाव), सौरव विष्णू शिंगणे (रा. देऊळगावमही), सत्यनारायण प्रल्हाद गुघडे, नितीन दिगंबर शिंगणे (तिघे रा. देऊळगावमही यांना ताब्यात घे तले.) यावेळी त्यांच्या ताब्यातून दोन मोटार पंप मिळाल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी शेंदुर्जन, देऊळगावमही, परतुर (जि.जालना) परिसरातून चोरून आणलेल्या मोटार पंप हे धोत्रानंदई, देऊळगावमही व अंढेरा परिसरातील शेतकर्यांना स्वत:च्या घरचे असल्याचे सांगून विकल्याचे सांगितले.
त्यांनी विकलेल्या देऊळगावमही, धोत्रानंदई अंढेरा येथील शे तकर्यांकडून महाराष्ट्र शासनाने अनुदानित केलेल्या अशा वेगवेगळय़ा कंपनीचे एकूण २७ पाण्याचे मोटार पंप व नऊ स् िप्रंकलर नोझल सेट स्टँडसह असा एकूण ४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. सदरचा माल जप्त करून आरोपींविरोधात अंढेरा पोलीस ठाण्यात कलम ४१ (१), (४) सी.आर.पी.सी. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील करीत आहेत. सदर कारवाईमध्ये पो.उप.नि.दिनकर गोरे, एएसआय प्रकाश राठोड, पोहेकाँ केशव नागरे, पोहेकाँ राजू ठाकूर, पो.ना. लक्ष्मण कटक, पो.काँ. गजानन जाधव, पो.काँ.गजानन शेळके यांचा सहभाग होता.