मोताळा तालुक्यातील लपाली येथे लाखाेंचा गांजा पकडला, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

By संदीप वानखेडे | Published: December 20, 2023 07:32 PM2023-12-20T19:32:39+5:302023-12-20T19:33:59+5:30

तालुक्यातील लपाली येथे राज्य उत्पादक शुल्क आणि धामणगाव बढे पाेलिसांनी घरातील १० किलाे आणि शेतात पेरणी केलेला लाखाे रुपयांचा गांजा २० डिसेंबर राेजी जप्त केला.

Ganja worth lakhs seized at Lapali in Motala taluka, state excise action | मोताळा तालुक्यातील लपाली येथे लाखाेंचा गांजा पकडला, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

मोताळा तालुक्यातील लपाली येथे लाखाेंचा गांजा पकडला, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई


मोताळा : तालुक्यातील लपाली येथे राज्य उत्पादक शुल्क आणि धामणगाव बढे पाेलिसांनी घरातील १० किलाे आणि शेतात पेरणी केलेला लाखाे रुपयांचा गांजा २० डिसेंबर राेजी जप्त केला. या प्रकरणी पेालिसांनी आराेपीस अटक केली आहे.

तालुक्यातील लपाली येथील गोपाल मुंढाळे यांची गुगळी शिवारात गट क्र. १५ मध्ये शेती आहे़ त्यांनी शेतात तुरीच्या तासात गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती़ त्या माहितीच्या आधारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त अरुण ओहळ, अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले़ त्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राहुल रोकडे, निरीक्षक विकास पाटील, दुय्यम निरीक्षक आर.के. फुसे, आर. ई. सोनोने, अमित आढळकर, नयना देशमुख, प्रकाश मुंगळे, नरेंद्र मावळे, राजू उरकुडे यांच्यासह धामणगाव बढे ठाणेदार सुखदेव भोरकडे, पोहेकॉ अरुण मापारी, राजेंद्र राणे, गजानन पाटील, सुरेश सोनवणे, संजय जवरे, पोकॉ सुरज रोकडे, नितीन इंगळे आणी रहीम तडवी यांचा समावेश करण्यात आला़ या पथकाने आज २० डिसेंबर रोजी सकाळी गोपाल मुंढाळे यांच्या शेतात धडक दिली असता शेतातील जवळपास २७ गांजाच्या झाडाचा पाला छाटून नेल्याचे दिसून आले़ यावेळी पथकाने गोपाल मुंढाळे यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी ओला आणी सुका असा १० किलो गांजा मिळुन आला. ते ताब्यात घेऊन शेतातील २७ झाडे किलो वजनाचे असा एकूण किलो गांजा पंचासमक्ष ताब्यात घेतले आहे़ यावेळी नायब तहसीलदार संजय टेंभिकर, मंडळ अधिकारी ए. आर. जोशी, तलाठी के. जी. सपकाळ आणी कोतवाल सुभाष मुंढाळे हे उपस्थित होते दरम्यान गोपाल मुंढाळे यास ताब्यात घेण्यात आले आहे. वृत्त लिहेपर्यंत उत्पादन शुल्क विभागात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालू होती. तसेच शेतातील गाजांची माेजणी सुरू हाेती.
 

Web Title: Ganja worth lakhs seized at Lapali in Motala taluka, state excise action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.