कचऱ्याची विल्हेवाट नळगंगेत!

By Admin | Published: May 16, 2017 01:04 AM2017-05-16T01:04:12+5:302017-05-16T01:04:12+5:30

मलकापूर : मलकापूर येथे दिवसाकाठी शेकडो टन घाण व केरकचऱ्याची तथा खाजगी बांधकामांच्या मलब्याची नदीत विल्हेवाट लावली जात आहे.

Garbage in waste disposal! | कचऱ्याची विल्हेवाट नळगंगेत!

कचऱ्याची विल्हेवाट नळगंगेत!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : मलकापूर येथे दिवसाकाठी शेकडो टन घाण व केरकचऱ्याची तथा खाजगी बांधकामांच्या मलब्याची नदीत विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे नळगंगा मायीच्या पात्राचे अक्षरश: डंम्पींग ग्राऊंड झाले आहे. त्यामुळे नदी काठच्या हजारो नागरीकांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. एकीकडे शासन नदी खोलीकरणासाठी लाखो रूपये खर्च करत असताना इथे मात्र घाणीमुळे नदी भरणाचा कार्यक्रम सुरू असून प्रशासनाचे त्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी पावसाळ्यापुर्वीची तयारी म्हणून पालिका अखत्यारीत नाल्यांची साफसफाई सुरू आहे. त्यातल्या त्यात शहरात खाजगी बांधकामांची भाऊगर्दी वाढलीय हयात निघणारा केरकचरा व मलबा शेकडो टन स्वरूपात असून त्याची विल्हेवाट नगर पालिकेच्या अधिकृत ‘डंम्पींग’ ग्राऊंडमध्ये न होता नळगंगा नदीच्या पात्रात लावली जात आहे.
मलकापूर शहरातून नळगंगा मायीची वाटचाल पुढे पुर्णामायीच्या पात्राकडे झालेली आहे. त्याच नळगंगा पात्राचे, काशीपुरा, सालीपुरा, बारादरी, किल्लावार्ड, मोहनपुरा, पारपेठ अशा नदीलगतच्या परिसरात अक्षरश: डम्पींग ग्राऊंड झाल्याचे विदारक चित्र आहे. त्यातल्या वैकुंठधाम स्मशानभुमी परिसरात त्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची अक्षरशा ‘हाईट’ झाल्याचे दिसते. नळगंगा मायीचे पात्र घाण व केरकचरा तथा मलब्यानंतर दिवसेंदिवस भरत चालल्याने मलकापुरात रोगराईची शक्यता निर्माण झाली आहे. साथीच्या रोगांना त्यात खुलेआम निमंत्रण दिल्या जात असून नदीकाठी वास्तव्य करणाऱ्या हजारो नागरीकांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झाला असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन मुग गिळून असल्याचे दिसते.
एकीकडे नदी खोली करणासाठी शासनाच्यावतीने दरवर्षी लाखो रूपये खर्च केल्या जातात इथे मात्र शहरातील घाण, केरकचरा व बांधकामांचा मलबा आदिंनी नदीपात्र भरण्याचा कार्यक्रम दिवसाढवळ्या सुरू आहे.
पालिका प्रशासनाने त्याविषयी कानावर हात ठेवले आहे. प्रशासनाचे त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने नदीपात्रात घाण करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्याविरूध्द कोण कारवाई करणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

आपल्याला काय बिलं निघाली की झालं!
नळगंगा नदी असो किंवा दुसरं काही आपण बघत राहायचं. शहरातला कचरा, घाण किंवा बांधकामाचा मलबा टाकून एकदा का नदीपात्र भरले की मग खोलीकरणाच्या नावाखाली त्याची बिल काढायची... कामं होवो अथवा ना होवो आपल्याला काय बिल निघालं की झालं असा पालिका अखत्यारीत काम करणाऱ्या काही ठेकेदारांचा खाक्याच बनला आहे.

शहरातली घाण व कचरा नदीपात्रात टाकण्याविषयी आमचे कसलेच आदेश किंवा सूचना नाहीत. तसं होत असेल तर ती चुकीची बाब आहे. नागरीकांनी तसे करणाऱ्यांची माहिती द्यावी. त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई प्रशासनाच्यावतीने करण्यात येईल.
- श्रीनिवास कुरे,मुख्याधिकारी न.प. मलकापूर

Web Title: Garbage in waste disposal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.