गॅस सिलिंडरचा काळाबाजार
By admin | Published: September 11, 2014 12:34 AM2014-09-11T00:34:17+5:302014-09-11T00:34:17+5:30
बुलडाणा बँकेतून अनुदान मिळणे बंद झाल्याने हॉटेलमध्ये वापर वाढला.
हर्षनंदन वाघ, नीलेश शहाकार/ बुलडाणा
गॅस सिलिंडरचा तुटवड्याची झळ गृहीणीसह संपुर्ण कुंटुबालाच बसत असते. अपुरा पुरवठा आणि त्यात गॅस सिलिंडरचा होत असलेला काळाबाजार व व्यावसायिक कामासाठी घरगुती सिंलेडरचा सुरू असलेला सर्रास वापर लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे. त्याच बरोबर घरगुती सिलेंडर मधुन व्यावसायिक सिंलेडरमध्ये गॅसभरण्याचा अवैध धंदा जोरात सुरू असल्याने पुरवठा विभागाने त्वरीत कारवाई करण्याची गरज लोकमत स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अधोरेखीत झाली आहे.
बुलडाणा शहर परिसरात बिअरबारसह जवळपास ६0 मोठी हॉटेल्स, १५0 पेक्षा जस्त छोटी हॉटेल, खानावळी आहेत तर २५0 पेक्षा जास्त चहाटपरी व स्टॉलस् आहेत. यातील अनेक हॉटेलमध्ये बाहेर लाकडाची किंवा कोळशाची चूल तसेच इले क्ट्रीक शेगडीचा वापर होताना दिसत असला तरी आत हॉटेलमध्ये गॅस सिलिंडरचा वापर होतो.
शासनाने यापूर्वी घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना केवायसी प्रणाली सक्तीची केल्यापासून व्यावसायिक गॅस सिलिंडर दिसून येत होते. मात्र आता पूर्वीप्रमाणे ग्राहकांना अनुदानाची सुट देवून सिलिंडर देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे घरगुती वापरासाठीचे गॅस सिलिंडरची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर पुन्हा वाढला आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या निळ्या रंगाच्या गॅस सिलिंडरमागे लपवून अनुदानित सिंलेडरचा वापर सर्रास होताना दिसुन येतो. केवळ बुलडाणा शहरातच जवळपास ५00 घरगुती गॅस सिलिंडरचा अवैधरित्या वापर होत आहे.
दरम्यान जल्हा पुरवठा अधिकारी एस बी भराडे यांनी गॅस सिलिंडरचा हॉटेल व खासगी वाहनांत वापर करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्यास प्रकाराची पड ताळणी करुन योग्य कारवाई करण्यात येईल असे सांगीतले. महसूल प्रशासनाचा अर्थपूर्ण कानाडोळा असल्याचे लोकमतने आज १0 सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागात राबविलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान दिसून आले.