वर्षभरात गॅस सिलिंडर ३०० ने वाढले; सबसिडी मिळते केवळ ४ रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:55+5:302021-07-17T04:26:55+5:30
शहरात चूलही पेटविता येत नाही! घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिला आता ...
शहरात चूलही पेटविता येत नाही!
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिला आता सर्रास चुलीकडे वळताना दिसत आहेत; परंतु शहरामध्ये खेड्याप्रमाणे जळतनाची व्यवस्था होत नाही. चूल पेटविण्याची व्यवस्थाही नसते.
- माधुरी सचिन गाभणे, गृहिणी.
दिवसेंदिवस गॅसचे भाव वाढत असल्याने हे गॅस सिलिंडर घरातील कोपऱ्यात ठेवण्याची वेळ आली आहे. आता चूल पेटविण्याची व्यवस्था नसल्याने नाईलाजास्तव गॅस सिलिंडरचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे गॅसचे दर कमी होण्याची गरज आहे.
- वंदना आत्माराम दांदडे, गृहिणी.
जुलै २० ६२४.२२ ४.१०
ऑगस्ट ६३३.२२ ४.१५
सप्टेंबर ६३३.२२ ४.३५
ऑक्टोबर ६३३.२२ ३.६०
नोव्हेंबर ६३३.२२ ४.७०
डिसेंबर ६८७.०२ ४.२१
जानेवारी २१ ७४०.३२ ३.२३
फेब्रुवारी ७६७.०२ ४.२०
मार्च ७८३.६२ ४.२१
एप्रिल ८१०.९२ ३.४०
मे ८१५.२२ ३.७०
जून ८२९.५० ४.२१
जुलै ८५५ ४.२१