शक्तिमानचा जिल्हाधिकाºयांच्याहस्ते गौरव

By admin | Published: June 20, 2017 01:30 PM2017-06-20T13:30:43+5:302017-06-20T13:30:43+5:30

फासे पारधी समाजातून यश मिळविणाºया या मुलाचा जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारीयांनी स्वत: आपल्या दालनात गुणगौरव केला.

Gaurav at the hands of the powerful district collector | शक्तिमानचा जिल्हाधिकाºयांच्याहस्ते गौरव

शक्तिमानचा जिल्हाधिकाºयांच्याहस्ते गौरव

Next

हिवरा आश्रम : लहानपणापासून आय.पी.एस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या
फासे पारधी तांड्यावरील शक्तीमान युवराज पवार याने इयत्ता दहावीच्या
परिक्षेमध्ये ८४ टक्के गुण घेऊन यश मिळविले आहे. फासे पारधी समाजातून
येवढे मोठे यश मिळविणाऱ्या या मुलाचा जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी
यांनी स्वत: आपल्या दालनात गुणगौरव केला.
शक्तीमान हा फासे पारधी समाजातील असून त्याचे वडील शेती सोबतच फासे पारधी
समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करीत आहे. शक्तीमानच्या दहावीच्या
यशाबद्दल त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिद््द, चिकाटीला कठोर
परिश्रमाची जोड देत दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवीले. शक्तिमानने
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये आपल्या कठोर परिश्रमाने उत्तुंग भरारी
घेत आईवडीलांच्या स्वप्नांना साकार केले आहे. शक्तीमान हा प.पू.शुकदास
महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाचा
विद्यार्थी आहे. मुलाच्या उज्जल भविष्यासाठी युवराव पवार यांनी आपल्या
प्रयत्नाची पराकाष्टा केली. शक्तीमानने सुध्दा वडीलांच्या अपेक्षा
पूर्तीसाठी कुठेच कसर ठेवली नाही. रात्रंदिवस केवळ अभ्यासाचा ध्यास घेऊन
दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळाले. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल
जिल्हाधिकारी पुलकुंडवार आणि अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी
शक्तिमान पवार व त्याच्या आई-वडिलाचा सत्कार केला. यावेळी युवराज पवार,
महेंद्र सौभागे, समाधान अकाळ, धर्मराज पवार, सिद्धू खेडेकर, रत्नाताई
पवार, विद्यमान पवार आदी उपस्थित होते.
फासे पारधी हा समाज आजही शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसोदूर आहे. जंगलातील
पशू-पक्ष्यांची शिकार करून त्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारे लोक.
रोजगार नाही, म्हणून वषार्नुवर्ष दारीद्रयात खितपत पडलेली जमात, अशा
आदिवासी तांड्यावरती शक्तीमान युवराज पवार यांने दहावीच्या परिक्षेत ८४
टक्के मिळवून यशाला गवसणी घातल्याने आदिवासी तांडयावर आनंदाला उधान
आल्याचे दिसून येत आहे.
 (वार्ताहर)

Web Title: Gaurav at the hands of the powerful district collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.