घरोघरी होणार आगमण गौरींचे;आभूषणासह सजावट साहित्याने फुुलला बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 05:49 PM2018-09-14T17:49:34+5:302018-09-14T17:52:47+5:30
बुलडाणा: गणरायाची गुरूवारी स्थापना झाल्यानंतर तिसºया दिवशी गौरींचे लक्ष्मीच्या पावलाने माहेरी आगमण होते.
बुलडाणा: गणरायाची गुरूवारी स्थापना झाल्यानंतर तिसºया दिवशी गौरींचे लक्ष्मीच्या पावलाने माहेरी आगमण होते. गौरींच्या स्वागतासाठी माहिलांनी तयारी केली असून जिल्ह्यात घरोघरी गौरींची अर्थात महालक्ष्मींची स्थापना शनिवारला करण्यात येणार आहे. महालक्ष्मीच्या साजाने जिल्ह्यातील प्रत्येक शहरातील बाजार सजला आहे. वेगवेगळ्या आभूषणासहित पदार्थ व सजावट साहित्याने बाजार फुलल्याचे दिसून येते.
शनिवारपासून तीन दिवस गौराईचा उत्सव चालणार असून त्यासाठी बुलडाणा येथील बाजारपेठही महालक्ष्मीच्या साजाने सजली आहे. शनिवारला गौरी आवाहन म्हणजे गौरीची स्थापना, रविवारला गौरी पूजन व सोमवारला गौरी विसर्जन केले जाणार आहे. या तीन दिवसांच्या उत्सवासाठी सध्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या वस्तू आल्या आहेत. घराघरात मखर तयार झाले आहेत. काही ठिकाणी मुखवटे व संपूर्ण मुर्तीही तयार केली जाते. मात्र सर्वाधीक मागणी ही मुखवट्यांनाच आहे. महालक्ष्मीचा साज खरेदी करण्यासाठी बाजारपेठेतही गर्दी उसळली आहे. घराघरात महालक्ष्मींच्या स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. मुखवट्यांची सजावट आणि नवीन मुखवटे खरेदीसाठी मूर्तिकारांकडेही गर्दी दिसून येत आहे. हा उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक पिढीत महालक्ष्मींना स्थापना करण्याची वैविध्यता बदलत गेली आहे. एका पिढीकडून दुसºया पिढीकडे हा उत्सव प्रत्येक घरात परंपरेने पुढे सरकतो; मात्र साधने नवीन असली तरी आस्था व श्रद्धा तितकीच कायम असल्याचे दिसून येते. महालक्ष्मींच्या जेवणाचा दिवस हा घराघरातील आनंद, उत्साह व मांगल्याचा दिवस असतो, जवळपास विविध प्रकारच्या भाज्या, मिष्टान्नांचा नैवद्य तयार केला जातो. प्रसाद घेण्यासाठीची आमंत्रणे कितीही असली तरी प्रत्येक जण आमंत्रण स्वीकारून महालक्ष्मींच्या दर्शनासाठी तरी हजेरी लावतोच एवढे महत्व महालक्ष्मी अर्थात गौराईच्या सणाला आहे. गौरार्इंचा आगमणाचा हा क्षण मांगल्याचा उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा बुलडाणा जिल्ह्यात जोपासली जाते.
पारंपारिक मुखवट्यांनाच मान
तांबे, पितळ आणि पंचधातूच्या मुखवट्यांपेक्षा मातीच्या मुखवट्यांनाच मागणी असते. बाजारामध्ये आकर्षक असे मुखवटे विक्रीस आले असून पारंपरिक मुखवट्यांना अधिक मान मिळत आहे. मुखवटे, साड्या, दागिने, हार, मांडव, पडदे, मखर अशा सर्व प्रकारचे साहित्य सध्या बाजारात उपलब्ध आहे.
रेडिमेड मखर
संपूर्णपणे रेडिमेड मखर बाजारात उपलब्ध असल्याने असे मखर घेण्याकडे महिलांचा कल दिसून येत आहे. साड्या अथवा मलमली पडद्याचे मांडव करत महिला आपल्या गौरींचे देखण्या मांडवात स्थापना करत. मात्र आता रेडिमेड मखर आल्याने त्याची मागणी वाढली आहे.