गावंडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शुटिंग व्हॉलिबॉल संघात निवड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:40 AM2021-09-15T04:40:16+5:302021-09-15T04:40:16+5:30
बुलडाणा येथे गत ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या विदर्भस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत त्याची विदर्भ संघात निवड झाली होती. त्यानंतर राजस्थान ...
बुलडाणा येथे गत ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या विदर्भस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत त्याची विदर्भ संघात निवड झाली होती. त्यानंतर राजस्थान येथील हनुमान गड येथे पार पडलेल्या भारतीय निवड चाचणी स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी बजावली. दरम्यान त्याच्या खेळकौशल्याची दखल घेत त्याची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली आहे. मूळचा सवडद येथील अनिकेत ग्रामीण भागाच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. सवडद या लहान गावात मधुकर गाडगे यांनी सुमारे पन्नास वर्षापूर्वी शुटींग व्हॉलिबॉलसाठी पुढाकार घेतला होता. या गावाला व्हॉलिबॉलची मोठी परंपरा असून याची मुहूर्तमेढ रोवणारे गाडगे यांचे गतवर्षी निधन झाले. त्यांच्या तालमीत तयार झालेल्या अनिकेतने स्वामी विवेकानंद संघाव्दारे आपल्या खेळाची सुरुवात केली. तद्नंतर स्व.भास्करराव शिंगणे कला प्रा.नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाव्दारा खेळल्या गेलेल्या अनेक राष्ट्रीय शुटींग व्हॉलिबॉल संघात त्याने घवघवीत यश संपादन करून गाव आणि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. दरम्यान अनिकेतच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे आणि सवडद ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.