प्राचार्य फोरमची सर्वसाधारण सभा आभासी पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:35 AM2021-05-19T04:35:55+5:302021-05-19T04:35:55+5:30
महिला महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथील प्राचार्य स्व. गणेश टाले यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात झाली. या सभेत ...
महिला महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथील प्राचार्य स्व. गणेश टाले यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात झाली. या सभेत अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होऊन महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. त्यामध्ये अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक प्रा. डॉ. केशव तुपे यांनी सहसंचालक पदाची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळताना प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याने तसेच सहसंचालक पदावर दोन वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. तो शासनाकडे पाठविण्याचे ठरले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील कोणत्याही प्राचार्यावर व्यवस्थापन अथवा कोणत्याही घटकांकडून अन्याय होत असेल किंवा प्राचार्यांच्या हक्कावर गदा येत असेल तर त्याच्या पाठीशी प्राचार्य फोरमने खंबीरपणे उभे राहण्याचा ठराव सभेत पारीत केला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्वत: घेणे अपेक्षित होते. याविषयावर सविस्तर चर्चा झाली. यापुढे मात्र विद्यापीठाने परीक्षेसारख्या महत्त्वपूर्ण विषयाचा भार महाविद्यालयावर सोपविताना सर्व प्राचार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी, असाही ठराव समंत करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्यांच्या नवीन वेतनश्रेणीबाबतचा प्रस्ताव २४ मेपर्यंत सहसंचालक कार्यालयांना पाठविण्याचाही ठराव पारित करण्यात करण्यात आला. त्याला त्वरित मंजुरी प्रदान करण्याचे आश्वासन सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी आपल्या मनोगतात दिले. प्राचार्य फोरमचे आजीवन सदस्यत्व व वार्षिक मेंटेनन्स फी यासंदर्भात चर्चा झाली व ठराव पारित करण्यात आला. प्राचार्य फोरमच्या जिल्हा व केंद्रीय कार्यकारिणीसंदर्भात चर्चा होऊन त्या गठित करण्यात आल्या. याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण विषयावर सुद्धा चर्चा पार पडली. सभेला प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे, प्राचार्य अरविंद देशमुख, प्राचार्य डॉ. चौधरी, प्राचार्य डॉ. जैन, प्राचार्य डॉ. नन्हई, प्राचार्य डॉ. बनमेरू, प्राचार्य डॉ. राऊत, प्राचार्य डॉ. शाहजाद, प्राचार्य डॉ. चौखंडे, प्राचार्य डॉ. चांदेवार, प्राचार्य डॉ. वऱ्हाटे, प्राचार्य डॉ. गुल्हाने, प्राचार्य डॉ. फुलारी, प्राचार्य डॉ. साबू, प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांच्यासह ७० सदस्य उपस्थित होते.