एका क्लिकवर मिळते करासह विविध विषयांची माहिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 11:45 AM2020-09-06T11:45:02+5:302020-09-06T11:45:41+5:30
अजिसपूर ग्रामपंचायने एक मोबाईल अॅप तयार केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अनेक ग्रामस्थांना आपण कराचा भरणा केला किंवा नाही, तसेच किती कर आहे, याविषयी माहिती नसते.अजिसपूर गावातील ग्रामस्थांना मात्र,एका क्लिकवर करासह विविध विषयाची माहिती मिळत आहे. ग्रामपंचायतने तयार केलेल्या मोबाईल अॅपवर सर्वच सुविधा देण्यात आली आहे.
डिजीटल व्यवहार करण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. अजिसपूर ग्रामपंचायने एक मोबाईल अॅप तयार केले आहे. या अॅपमध्ये गावाविषयी, पदाधिकारी, प्रतिनिधी, कृषी विज्ञान, बाजारभाव ई दवंडी, बातम्या, विकासकामे, मार्केट, आरोग्य, शिक्षण, नोकरीविषयक, महत्त्वाचे संपर्क, उद्योग, सेवा व योजना ग्रामपंचायत प्रशासन, विषय समित्या आदींविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गावाची परिपूर्ण माहिती या अॅपवर देण्यात आली आहे. तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये गावाचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे मोबाईल क्रमांकासह माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.कृषी विषयी सह्याद्री वाहीनीवर शेतकऱ्यांसाठी झालेले मार्गदर्शक कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे काय भाव आहेत हे पाहण्याची सुविधा या अॅपवर आहे. तसेच गावात दिली जाणारी दवंडीही अॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुशिक्षीत बेरोजगारांसाठी नोकरीविषयक माहिती, तसेच गावातील आरोग्य कर्मचारी, शिक्षण विभागातील कर्मचरी यांची माहिती देण्यात आली आहे. हे अॅप तयार करण्यासाठी माजी सरपंच बाळाभाऊ जगताप, माजी उपसरपंच शितल सिरसाट, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक व्ही.आर. पंडीत यांनी परिश्रम घेतले.
व्यवसायाची संधी
गावातील शेतकºयांसह व्यवसाय करणाºयांना या अॅपच्या माध्यमातून दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकरी आपल्याकडे असलेल्या शेतमालाची माहिती अॅपवर देऊ शकतात. तसेच ज्यांना खरेदी करायचे आहे त्यांनाही हे अॅप उपयोगी पडेल असे ग्राविकास अधिकारी व्ही.आर.पंडीत यांनी सांगितले.