बेईमानी आणि कपटाने हिसकावलेली शिवसेना परत मिळविण्यासाठी सज्ज व्हा: सुषमा अंधारेंचे आवाहन

By अनिल गवई | Published: March 1, 2023 09:39 PM2023-03-01T21:39:38+5:302023-03-01T21:40:57+5:30

Sushma Andhare : निष्ठावान शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून वाढविलेली शिवसेना बेइमानांनी कपट आणि षडयंत्र करून हिसकावली आहे. ही शिवसेना गद्दारांच्या तावडीतून सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी येथे केले.

Get ready to reclaim the Shiv Sena that was usurped by dishonesty and deceit: Sushma Andhare's appeal | बेईमानी आणि कपटाने हिसकावलेली शिवसेना परत मिळविण्यासाठी सज्ज व्हा: सुषमा अंधारेंचे आवाहन

बेईमानी आणि कपटाने हिसकावलेली शिवसेना परत मिळविण्यासाठी सज्ज व्हा: सुषमा अंधारेंचे आवाहन

googlenewsNext

- अनिल गवई

खामगाव: निष्ठावान शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून वाढविलेली शिवसेना बेइमानांनी कपट आणि षडयंत्र करून हिसकावली आहे. ही शिवसेना गद्दारांच्या तावडीतून सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी येथे केले.

िनवडणूक आयोगाच्या िनर्णयामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे गेले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जनतेत जाण्यावर भर दिल्या जात आहे. बुधवारी शिवगर्जना या अभियानाच्या निमित्ताने शिवसेना उपनेत्या अंधारे यांची खामगाव येथील गांधी चौकात जाहीर सभा झाली. यावेळी विचार पीठावर सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, प्रा. नरेंद्र खेडेकर, जालींधर बुधवंत, दशरथ लोहबंदे, वसंतराव भोजने, अविनाश दळवी, िभकुलाल जैन, चंदा बढे, जिजा राठोड, वैशाली सावंग, देविदास उमाळे, विजय बोदडे, माजी नगराध्यक्ष गणेश माने, अशोक हटकर, तेजेंद्रसिंह चव्हाण, अाशीष रहाटे यांची उपसि्थती होती.

या सभेत बोलताना अंधारे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बुलडाणा जिल्ह्यातील खासदार आणि दोन आमदारांवर कडाडून टिका केली. यावेळी त्या म्हणाल्या की, यापूर्वीही शिवसेनेत उठाव झाला. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. मात्र, ते शिवसेनेच्या मुळावर उठले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मुळावरच प्रहार करण्यास सुरूवात केली आहे. स्वाभीमान विकून या लोकांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे. उध्वव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेल्याचा बहाणा करीत संधीसाधूनी सत्तांतर घडवून आणले. मात्र, उध्दव ठाकरे कुणासोबतही असले तरी महाराष्ट्राचे हित जोपासणार्या व्यक्तीसोबतच ते आहेत.

शिवसेना प्रमुखांची शिवसेना हिसकावल्याचे अतीव दु:ख त्यांना आज ना उद्या होईलच. आजही यातील अनेक जण निद्रानाशाने व्यथीत आहेत. मुख्यमंत्री दिल्लीश्वरांशी संवाद साधतात. मात्र, जनतेशी त्यांचा असलेला संवाद तुटत आहे. त्यांनी केलेल्या पापाची शिक्षा त्यांना मिळेलच असेही त्या म्हणाल्या. लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच शिवगर्जना सप्ताह असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. संचालन रवी महाले यांनी केले. तत्पूवीर् दत्ता पाटील, दशरथ लोहबंदे, प्रा. नरेंद्र खेडेकर यांचीही समायोचित भाषणे झालीत.
 

Web Title: Get ready to reclaim the Shiv Sena that was usurped by dishonesty and deceit: Sushma Andhare's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.