भुरट्या चाेरट्यांचा बंदाेबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:31 AM2021-08-01T04:31:50+5:302021-08-01T04:31:50+5:30

वरलीच्या जुगारावर धाड माेताळा : बाेराखेडी पाेलिसांनी वरली जुगारावर धाड टाकून असलम खा गुलाब खा याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून ...

Get rid of clutter you don't need | भुरट्या चाेरट्यांचा बंदाेबस्त करा

भुरट्या चाेरट्यांचा बंदाेबस्त करा

Next

वरलीच्या जुगारावर धाड

माेताळा : बाेराखेडी पाेलिसांनी वरली जुगारावर धाड टाकून असलम खा गुलाब खा याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून 3२५ रुपयांचा ऐवज जप्त केला. पुढील तपास बाेराखेडी पोलीस करीत आहेत.

जुगारावर पाेलिसांची धाड, चाैघांवर कारवाई

माेताळा : बाेराखेडी पाेलिसांनी जुगारावर धाड टाकून चाैघांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १४५० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी आसिफ खाँ हशम खाँ, निंबाजी नामदेव गाेरे, शेख सादिक शेख गफार, सुभाष पुनाजी गाेरे आदींवर कारवाई करण्यात आली.

महिलेकडून दारू जप्त, गुन्हा दाखल

बुलडाणा : शहरातील कैकाडीपुरा भागात राहणारी महिला अवैध दारू विक्री करीत असताना तिच्यावर बुलडाणा शहर पाेलिसांनी कारवाई केली. तिच्याकडून १०५० रुपयांचा ऐवज जप्त केला. पुढील तपास बुलडाणा शहर पेालीस करीत आहेत.

चिखली शहरातून दुचाकी लंपास

चिखली : शहरातील एका रुग्णालयासमाेर लावलेली दुचाकी अज्ञात चाेरट्यांनी लंपास केल्याची घटना २८ जुलै राेजी उघडकीस आली. याप्रकरणी चिखली पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंबादास देवसिंग राठाेड यांची दुचाकी चाेरट्यांनी लंपास केली.

अपघातप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा

देउळगाव राजा : बाेलेराे वाहनाने कारला धडक दिल्याने चार जण जखमी झाले हाेते. याप्रकरणी २८ जुलै राेजी बाेलेरे (क्र. एमएच २१ व्ही २६५८)च्या चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देउळगाव राजा पेालीस करीत आहेत.

वाहतुकीस अडथळा, चालकाविरुद्ध गुन्हा

डाेणगाव : येथील बसस्थानकासमाेरील स्टेट बॅंकेजवळ मेहकर ते मालेगाव रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण हाेईल असा ॲपे उभा केल्याने चालकाविरुद्ध डाेणगाव पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास डाेणगाव पाेलीस करीत आहेत.

Web Title: Get rid of clutter you don't need

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.