चिखली येथील आरोग्यविषयक समस्या दूर करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:23+5:302021-05-29T04:26:23+5:30
कोरोना काळात शासकीय आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. यापृष्ठभूमीवर राहुल बोंद्रे यांनी ना.टोपे यांची प्रत्यक्ष भेट घेवून विविध समस्यासंदर्भाने ...
कोरोना काळात शासकीय आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. यापृष्ठभूमीवर राहुल बोंद्रे यांनी ना.टोपे यांची प्रत्यक्ष भेट घेवून विविध समस्यासंदर्भाने निवेदन सादर केले. यामध्ये प्रामुख्याने चिखली उपजिल्हा रूग्णालय सुरू करण्यासह तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथे प्राथमीक आरोग्य केंद्राची इमारत मागील काळात पूर्ण झालेली असताना अद्याप सुरू होण्याच्या प्रतिक्षेत असल्याची बाब बोंद्रेंनी निदर्शनास आणून दिली. दरम्यान, याठिकाणी तातडीने कर्मचारी भरती करण्याचे आदेश अप्पर मुख्य सचिवांना देण्यात आले आहे. शासकीय अनुराधा कोविड सेंटर येथे मागील औषधी, सॅनीटायझर, मास्क साफसफाईकडे प्रशासनाच्या होणाऱ्या दुर्लक्षाबाबत ना.टोपेंनी नाराजी व्यक्त करीत तात्काळ कार्यवाहीचे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकीत्सक यांना निर्देश दिले असून या निवेदनावर व्हि.आय.एम.पी. असा शेरा दिला आहे, अशी माहिती राहुल बोंद्रेंनी दिली आहे.
डिसेंबरपूर्वी उपजिल्हा रूग्णालय सुरू करण्याचे निर्देश!
चिखली उपजिल्हा रूग्णालयाचे बांधकाम २ वर्षापासून असून अद्याप ५० टक्के देखील पूर्ण झालेले नाही. या रूग्णालयाचे काम तातडीने पूर्णत्वास न्यावे, या मागणीवर ना.टोपेंनी उपजिल्हा रूग्णालय येत्या डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तोपर्यंत कर्मचारी निवासस्थानांमध्ये तातडीने जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देण्याचे निर्देश देखील दिले आहेत.