पिंप्री अडगाव येथील महिलांचा पाण्यासाठी घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:05 AM2017-11-14T01:05:43+5:302017-11-14T01:06:04+5:30

संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री अडगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्यामुळे व १४0 गाव पाणीपुरवठायोजनेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे गावातील नागरिकांना, महिलांना व अबालवृध्दांना गत २७ दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

Ghaggar Morcha for women's water in Pimpri Adgaon | पिंप्री अडगाव येथील महिलांचा पाण्यासाठी घागर मोर्चा

पिंप्री अडगाव येथील महिलांचा पाण्यासाठी घागर मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देहिवाळ्य़ातच पाणीटंचाई महिलांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : तालुक्यातील पिंप्री अडगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्यामुळे व १४0 गाव पाणीपुरवठायोजनेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे गावातील नागरिकांना, महिलांना व अबालवृध्दांना गत २७ दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदने सुध्दा दिली होती. मात्र पाणी प्रश्नावर प्रशासनाने कुठलाही पर्याय उपलब्ध करुन न दिल्यामुळे अखेर अभयसिंह मारोडे तसेच प्रहार जनशक्ती पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वात १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता गावातील शेकडो महिला व पुरुषांचा घागर मोर्चा गटविकास अधिकार्‍यांच्या दालनात पोहचला मात्र गटविकास अधिकारी हे हजर नसल्यामुळे शेकडो महिलांचा व नागरिकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार यांनी पं.स.चे पाणीपुरवठा कक्षाचे कर्मचारी यांना बोलावल्यानंतर व गावातील पाईपलाईनचे १४0 गावाच्या पाईपलाईनला जोडणी करुन देवून तात्काळ  ही पाईपलाईन जोडल्यानंतर हा मोर्चा परत गावाकडे दुपारी ४ वाजता परतला.
गत २७ दिवसांपासून पिंप्री अडगाव येथे पाणीटंचाई असल्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी मोलमजुरी सोडून व कामबंधे सोडून पाण्यासाठी भटकावे लागत होते. यासाठी बर्‍याच वेळा नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे व ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनेही दिली. मात्र यावर कुठल्याही उपाययोजना ग्रा.पं.च्यावतीने होत नसल्यामुळे शेकडो महिलांचा घागर मोर्चा दुपारी १ वाजता पंचायत समितीमध्ये तर दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयात धडकला होता. त्यामुळे या मोर्चाची धास्ती घेत व पाणीप्रश्न दूर करण्यासाठी तहसीलदार राठोड यांनी पं.स.च्या पाणीपुरवठा कर्मचार्‍यांना बोलावून व पिंप्री अडगाव येथे ग्रामसचिव व सरपंच यांना पाठवून गावातील पाईपलाईन ही १४0 गाव पाणीपुरवठा येाजनेच्या पाईपलाईन सोबत जोडण्यात यावी अशी सूचना दिल्यानंतर पाणीपुरवठा कर्मचार्‍यांनी तात्काळ गावात जावून ही पाईपलाईन जोडल्यानंतर व १४ नोव्हेंबर पर्यंत १४0 गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी हे ग्रा.पं.च्या विहिरीत सोडण्यात येईल असे आश्‍वासन दिल्यानंतर हा घागर मोर्चा परत दुपारी ५ वाजता गावाकडे परतला. यावेळी या मोर्चात अभयसिंह मारोडे, शुभम चिकटे, अनिकेत शेळके, पुरुषोत्तम गायगोळ, विजय ढोले, रवींद्र खुपसे तसेच शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
-
 

Web Title: Ghaggar Morcha for women's water in Pimpri Adgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी