घाटपुरी नाका पाण्याच्या टाकीजवळील जुगारावर छापा
By अनिल गवई | Published: July 23, 2023 11:57 AM2023-07-23T11:57:11+5:302023-07-23T11:57:17+5:30
एक लाख सहा हजाराचा मुद्देमाल जप्त: १० जणांवर कारवाई
खामगाव: शहरातील घाटपुरी नाका पाण्याच्या टाकीजवळ मोठ्याप्रमाणात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने शनिवारी उशिरा रात्री छापा मारला असता, दहा जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून एक लाख सहा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, खामगाव शहरात श्रींच्या पालखीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या उपअधिक्षक विवेक पाटील यांना घाटपुरी नाका पाण्याच्या टाकीजवळ मोठ्याप्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धाड टाकली असता पंकज उपॐर् विकी नारायण चौधरी वय ३७, रा. शिवाजी वेस, अमित मधुकर जाधव वय ३५ रा. सुटाळपुरा, कपिल सहदेव वानखडे वय ३० रा. घाटपुरी, संतोष काशीराम श्रीनाथ वय ४१, रा. भोईपुरा खामगाव, रूपेश प्रकाश सूर्यवंशी वय ३१ रा. भोईपुरा, खामगाव, सुनिल जगदेवराव गोडाळे वय ३५ रा. राणा आखाडा, वामन नारायण उंबरकार वय ५० रा. गोपाळ नगर, सुनिल अशोक डाहे वय ३४ रा. गोपाळ नगर, अजय िकसन बैरागी वय २२ रा. घाटपुरी, अरूण नारायण शेट्ये वय ७० रा. गोपाळ नगर यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख ४५ हजार ३९० रूपये जुगाराचे साहित्य सात मोबाईल आणि इतर साहित्य असा एकुण एक लाख सहा हजार ५९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक विवेक पाटील, शिवाजी नगर शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक अरूण परदेशी, पोउपनि विनोद खांबलकर, पोहेकॉ निलसिंग चव्हाण, नापोकॉ देवेंद्र शेळके, संदीप टाकसाळ, संतोष वाघ, नितीन भालेराव, प्रविण गायकवाड, भगवान खोसे यांनी ही कारवाई केली.