सुलतानपूर येथे आरोग्य यंत्रणेची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:15 AM2017-10-16T01:15:20+5:302017-10-16T01:16:43+5:30
सुलतानपूर : येथे ‘डेंग्यू तापाने घेतला चिमुकलीचा बळी, महिनाभरातील दुसरी घटना’, या मथळ्याखाली वृत्त ‘लोकम त’मध्ये प्रसिद्ध होताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुलतानपूर : येथे ‘डेंग्यू तापाने घेतला चिमुकलीचा बळी, महिनाभरातील दुसरी घटना’, या मथळ्याखाली वृत्त ‘लोकम त’मध्ये प्रसिद्ध होताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. दरम्यान, आरोग्य यंत्रणेच्या अधिकार्यांनी सुलतानपूर गावाची पाहणी करून तुंबलेल्या नाल्या, परिसरातील अस्वच्छता दूर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.चव्हाण व लोणार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पबितवार यांनी गावकर्यांच्या घरातील पाणीसाठे, स्वच्छता याबाबत काय काळजी घ्यावी, याविषयी नागरिकांना माहिती दिली. दरम्यान, चिखली, बुलडाणा, मेहकर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा आदी ठिकाणच्या आरोग्य पर्यवेक्षकांनी सुलतानपुरातील परिसराचे सर्वेक्षण केले. तसेच या वृत्ताची माहिती मिळताच माजी मंत्री सुबोध सावजी यांनीही सुल तानपूर व वडगाव तेजन गावाला भेट देऊन डेंग्यूसदृश तापाने मृ त्यू पावलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. मृतक चिमुकल्याचे वडील सै.अलीम यांच्या घरी जाऊन सावजी यांनी आस्थेने चौकशी केली. सरकारी दवाखान्यात सुविधा मिळत नाही, रुग्णांची काळजी घेतल्या जात नाही, शासकीय यंत्रणा केवळ पगारापुरतेच काम करते, या चिमुकल्यांच्या मृत्यूला शासन आणि प्रशासच जबाबदार असल्याचा आरोप सावजी यांनी यावेळी केला. पुढे बोलताना सावजी म्हणाले, की सरकारी दवाखान्यावर विश्वास बसेल, अशी प्रशासनाने व्यवस्था करावी. हीच घटना मुंबई-पुणे येथे झाली असती तर शासनाने आर्थिक मदत दिली असती. ग्रामीण भागातील सरकारी यंत्रणेचे कोणतेच अधिकारी मृतक चिमुकल्यांच्या नातेवाइकांची साधी विचारपूससुद्धा करायला आले नाही. दरम्यान, वडगाव तेजन ये थील मृतक चिमुकलीच्या घरी तिचे वडील संतोष शिरसाट यांचीसुद्धा सावजी यांनी भेट घेतली. मृतकाच्या नातेवाइकांना व उपचार घेत असलेल्या रुग्णांना आरोग्य यंत्रणेने भेट देऊन मदत करावी, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत शे.हारुण, बबन पनाड, के.के.तेजनकर, सीताराम दानवे, प्रल्हाद पनाड, आशिष देशमुख, शे.मोसीब, शे.अमीन, शे.अमीर, रामदास जाधव, रंगनाथ शिरसाट, किसन शिरसाट, विठोबा जाधव, भगवान पवार आदींची उपस्थिती हो ती.