काेविड सेंटरला औषधी, साहित्याची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:35 AM2021-05-27T04:35:43+5:302021-05-27T04:35:43+5:30
या ग्रुपच्या वतीने मंगळवारी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष तथा भगवद्गीतेचे चिंतनकार आर. बी. मालपाणी यांच्या हस्ते खुर्च्या, टेबल, पाणी बॉटल्स, ...
या ग्रुपच्या वतीने मंगळवारी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष तथा भगवद्गीतेचे चिंतनकार आर. बी. मालपाणी यांच्या हस्ते खुर्च्या, टेबल, पाणी बॉटल्स, औषधी, सॅनिटायझर्स, दैनंदिन उपयोगी वस्तू व फळे यांचे शासकीय कोविड सेंटरला लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ग्रुपचे अध्यक्ष प्रा. नीलेश निकस, विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, समाधान म्हस्के, प्राचार्य पंढरीनाथ शेळके, आश्रमाचे विश्वस्त पुरुषोत्तम अकोटकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल म्हस्के, काँग्रेस नेते संतोष खरात यांच्यासह कोविड सेंटरचे डॉक्टर्स व कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रा. नीलेश निकस यांच्या कार्याचा गौरव. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी जनसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे अध्यक्ष प्रा. नीलेश निकस यांच्या कार्याचा गौरव केला.