कर भरणाऱ्यांना नगरपालिकेने दिल्या भेटवस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:32 AM2021-04-15T04:32:45+5:302021-04-15T04:32:45+5:30

लकी ड्राॅ काढून ४५ बक्षिसांचे घरपाेच हाेणार वितरण लोकमत न्यूज नेटवर्क लाेणार : काेराेनामुळे नगरपालिकेचा थकलेला कर वसूल करण्यासाठी ...

Gifts given by the municipality to the taxpayers | कर भरणाऱ्यांना नगरपालिकेने दिल्या भेटवस्तू

कर भरणाऱ्यांना नगरपालिकेने दिल्या भेटवस्तू

Next

लकी ड्राॅ काढून ४५ बक्षिसांचे घरपाेच हाेणार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क

लाेणार : काेराेनामुळे नगरपालिकेचा थकलेला कर वसूल करण्यासाठी १२ एप्रिल राेजी लकी ड्राॅ काढण्यात आला. यामधील ४५ बक्षिसांचे लाभार्थ्यांना घरपाेच वितरण करण्यात येणार आहे.

या लकी ड्राॅमधील विजेत्या करदात्यांचे नाव ऑनलाईन पद्धतीने घोषित करण्यात आले. हा कार्यक्रम कोविड - १९च्या पार्श्वभूमीवर ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे सर्वांना दाखविण्यात आला. यावेळी आनंद प्रकाशचंद आचलिया हे प्रथम क्रमांकाच्या ४० इंची एलईडी टीव्हीचे विजेते ठरले. द्वितीय क्रमांक फ्रीज विजेता - मोहन रंगअप्पा शेटे, तृतीय क्रमांक कुलर विजेता - प्रकाश विठोबा मापारी, चतुर्थ क्रमांक गॅस शेगडी - श्यामराव बढे, पाचवा क्रमांक शांतिलाल सिंगी - मिक्सर तर पाच फॅन, दहा हेल्मेट, पाच इस्त्री, आठ स्टडी टेबलच्या विजेत्यांनाही घरपोच बक्षिसे पाठविण्यात येणार आहेत. यावेळी नगराध्यक्ष पूनम पाटोळे, उपनगराध्यक्ष बादशा खान, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, पाणीपुरवठा सभापती आबेद खान, साहेबरावजी पाटोळे, शे. रहुफ, नगरसेवक संतोष मापारी, डाॅ. अनिल मापारी, गुलाबराव सरदार, सतीश कापुरे, नगरपालिका कर्मचारी संजय ऐनेवार, अशोक निचंग, शेख अनवर, निसार शेख, पारस सुटे, धनशाम भालेराव, दीपक चोपडे, शे. रफिक, फुलचंद व्यास, मनीष पाटोळे उपस्थित हाेते.

८० टक्के करवसुली

नगर परिषेदेने मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी लकी ड्राॅ स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातून नगरपालिकेची ८० टक्के म्हणजेच १ कोटी रुपयांची कर वसुली झाली.

- विठ्ठल केदारे, मुख्याधिकारी नगर परिषद, लोणार

Web Title: Gifts given by the municipality to the taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.