अद्रक पिकाला अनुदान देणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:21+5:302021-07-23T04:21:21+5:30

योजनांचा १६.५ टक्के निधी वळती बुलडाणा : आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या निर्माणसाठी जिल्हा नियोजन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमधील ...

Ginger crop needs subsidy! | अद्रक पिकाला अनुदान देणे गरजेचे!

अद्रक पिकाला अनुदान देणे गरजेचे!

Next

योजनांचा १६.५ टक्के निधी वळती

बुलडाणा : आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या निर्माणसाठी जिल्हा नियोजन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमधील १६.५ टक्के निधी गेल्या वर्षी आरोग्य क्षेत्रातील सुविधांसाठी खर्च केला गेला. त्यातून आता जिल्ह्यात चांगल्या सुविधा निर्माण झाल्या आहेत.

अवैध दारू बाळगणाऱ्यांचे प्रमाण वाढले

मोताळा : अवैधरित्या दारू बाळगणाऱ्यांचे प्रमाण सध्या वाढलेले आहे. अनेकवेळा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा मारल्यानंतर अवैध दारूचा साठा जप्त करण्यात येतो. त्यामुळे पोलिसांनी प्रत्येक आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रात तपासणी मोहीम राबविणे गरजेचे आहे.

मोफत धान्यापासून लाभर्थी वंचित

लोणार : रेशनकार्डधारकांना मोफत धान्य दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ग्रामीण भागातील अनेक लाभार्थी शिधापत्रिका असूनही या धान्यापासून वंचित राहिले आहेत. काही लाभार्थी वेगवेगळ्या त्रुटींअभावी रेशनपासून वंचित राहिले.

विद्युत पुरवठा खंडित झाल्यास उपचारास अडचणी

बीबी : रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने आरोग्य केंद्र उभारले. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये रुग्ण रात्री, अपरात्री उपचारासाठी दररोज येत असतात; परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्यास येथे मोठ्या अडचणी निर्माण होतात.

पोलिसांकडून दुचाकीस्वारांची चौकशी

सुलतानपूर : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे. त्यामुळे नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. मेहकर ते सिंदखेड राजा मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुचाकीस्वारांची चौकशी केली जात आहे.

Web Title: Ginger crop needs subsidy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.