सातपुड्यात यशस्वी होतोय अद्रक शेतीचा प्रयोग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:19 PM2019-01-12T13:19:42+5:302019-01-12T13:20:12+5:30
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अद्रक शेतीचा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. सध्या भावात तेजी असल्याने यावर्षी अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे.
- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अद्रक शेतीचा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. सध्या भावात तेजी असल्याने यावर्षी अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात तसे अद्रक उत्पादन घेणाऱ्यांची संख्या फार नाही. सामान्य शेतकºयांना न झेपावणारा उत्पादन खर्च, पाण्याची कमरता व अद्रकासाठी उपयुक्त जमिन अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. परंतु तरीही काही शेतकरी त्यांच्या शेतात नवनविन प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करतात. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे १०० एकरावर अद्रक लागवड केली जाते. घाटावर देऊळगावराजा व घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात हे प्रमाण जास्त आहे. अद्रक हे जास्त कालावधीचे पिक असल्याने व उत्पादन खर्च अधिक असल्याने याकडे शेतकºयांचा कल कमी असल्याचे दिसून येते. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्रक शेतीत सातत्य टिकवून ठेवले त्यांच्यासाठी सध्याचा काळ म्हणजे ‘सोन्याचे दिवस’ असेच चित्र आहे. सध्या ठोक बाजारात अद्रकाचे भाव ५० ते ६० हजार रूपये क्विंटलवर येऊन पोहचेले आहेत. त्यामुळे अद्रक उत्पादनातून शेतकºयांची घडी सावरताना दिसतेय. सध्या अद्रक शेतीतून एकरी १२५ ते १५० क्विंटल उत्पादन होत आहे. सध्याचे भाव पाहता एकरी ७ ते ८ लाख रूपयांचे अद्रक शेतकरी घेत आहेत. उत्पादन खर्च एकरी १ ते दीड लाख रूपयांच्या घरात आहे. त्यामुळे सध्या शेतकºयांना साधारपणपणे ५ ते ७ लाख रूपये निव्वळ नफा उरत असल्याचे दिसून येते. अद्रक विक्री करण्याकरीता बुलडाणा तसेच अकोला येथेही मोठी बाजारपेठ नसल्याने शेतकरी जळगाव खान्देश येथे अद्रकाची विक्री करतात.
मालाची आवक घटल्याने वाढले भाव!
महाराष्ट्रात केरळमधूनही अद्रक मोठ्या प्रमाणावर येते. परंतु सरत्या वर्षात केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अद्रक शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विदर्भात पावसाळाच झाला नसल्याने येथीलही उत्पादन घटले. परिणामी मागील वर्षी २ ते ३ हजार रूपये प्रतिक्विंटल असलेले भाव वाढत जावून सध्या ५० ते ६० हजार रूपयांवर जावून पोहचले आहेत. किरकोळ बाजारात तर २०० रूपये किलोने ग्राहकांना अद्रक खरेदी करावे लागत आहे.
पिकासाठी लागतो सर्वाधिक कालावधी!
अद्रक शेती न करण्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे या पिकासाठी १० ते ११ महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणजे साधारणपणे एक वर्षच यात निघून जाते. शेवटी योग्य भाव मिळाला नाही, तर केवळ उत्पादनखर्चच निघतो. परंतु अशाही परिस्थीतीत सातत्य टिकवून ठेवणाºया शेतकºयांसाठी २०१९ हे वर्ष आशेचा किरण घेवून आले आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून अद्रक शेती करीत आहे. दरवर्षीच चांगले भाव राहतात, असे नाही. परंतु यावर्षी मात्र भावात तेजी असल्यामुळे अद्रक उत्पादनात सातत्य ठेवल्याचे समाधान वाटते.
देविदास वानखडे, अद्रक उत्पादक शेतकरी
लहूगाव (भगतपुरा) ता.संग्रामपूर
अद्रक उत्पादनासाठी भेगा न पडणारी व गाळाची जमिन आवश्यक आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी जमिन आहे. परंतु अद्रक उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या मोठी नाही. यावर्षी भावात तेजी असल्याने नवनविन प्रयोग करू पाहणाºया शेतकºयांसमोर आशेचा किरण निर्माण झाला आहे.
डॉ.अनिल गाभणे
शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद