मोताळा तालुक्यात मुलीच आघाडीवर
By admin | Published: May 31, 2017 12:23 AM2017-05-31T00:23:08+5:302017-05-31T00:23:08+5:30
९३.२३ टक्के निकाल : मुलींची टक्केवारी ९४.१७
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेबु्रवारी-मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ३० मे रोजी दुपारी एक वाजता आॅनलाइन जाहीर करण्यात आला. इंटरनेटच्या साह्याने मिळालेल्या निकालानुसार मोताळा तालुक्याचा निकाल नियमित विद्यार्थ्यांचा ९३.२३ टक्के लागला असून, रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल ४६.५५ टक्के तर एकूण निकाल ९३.२३ टक्के लागला आहे. निकालामध्ये मुलांची टक्केवारी ९२.५२ असून मुलींची टक्केवारी ९४.१७ इतकी आहे. निकाल वेळेत घोषित झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांवरील ताण कमी झाला असून उत्साहाचे वातावरण आहे.
मोताळा तालुक्यात १६ उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामार्फत १६८३ नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांच्यापैकी १५६९ उत्तीर्ण झाले आहेत.
त्यांची टक्केवारी ९३.२३ इतकी असून ११६ विद्यार्थी रिपीटर यापैकी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ४६.५५ टक्के आली आहे. शहरातील स्व.बबनराव देशपांडे कनिष्ठ महाविद्यालय मोताळा (विज्ञान १००, आर्ट ८४.४४, कॉमर्स ८७.०३) असा एकूण निकाल ९४.५३ टक्के लागला आहे. प्रियदर्शनी कन्या उच्च माध्यमिक विद्यालय बोराखेडी विज्ञान १०० टक्के तर आर्ट ९१.३९ टक्के असा एकूण निकाल ९५.७८ टक्के, जवाहर उर्दू उच्च माध्य. विद्यालय मोताळा विज्ञान ९५ टक्के तर आर्ट ८४.०९ असा एकूण ९१.१२ टक्के, अनंतराव सराफ कनिष्ठ महाविद्यालय शेलापूर बु: ९३.६१ टक्के, एम.ई.एस. कनिष्ठ महाविद्यालय धामणगाव बढे आर्ट १०० टक्के तर कॉमर्स ९७.२२ आसा एकूण ९८.५८ टक्के, तिरूपती बालाजी कनिष्ठ महाविद्यालय कोऱ्हाळा बाजार ९४.९१ टक्के, स्व. शिवाजीराव भिकुजी पाटील कनिष्ट विद्यालय पोफळी ९३.७५ टक्के, राष्ट्रीय उच्च माध्य. विद्यालय पिंप्रीगवळी आर्ट ८१.९८ तर कॉमर्स ९५.५५ असा एकूण ८५.८९ टक्के, श्री चांगदेव कनिष्ठ महाविद्यालय उबाळखेड ९३.३३ टक्के, कर्मवीर भिकमसिंह पाटील मा. व उच्च माध्य.विद्यालय निपाना ९४.४४ टक्के, कुलस्वामिनी उच्च माध्य.विद्यालय पिंपळगावदेवी ८०.०० टक्के, राजे छत्रपती उच्च माध्य.विद्यालय जयपूर ९२.५० टक्के, नॅशनल उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय रोहिणखेड १०० टक्के, नवजीवन कनिष्ठ महाविद्यालय रोहिणखेड ९४.२३ टक्के, प्रियदर्शनी गर्ल्स माध्यमिक व उच्च माध्यमिक (एमसीव्हिसी) ९४.५५ आणि जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोथळी ९०.३२ टक्के निकाल लागला आहे.