बारावीच्या विद्यार्थीनीचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 04:15 PM2019-01-02T16:15:25+5:302019-01-02T16:16:15+5:30
मलकापूर : तालुक्यातील कुंड येथे इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थीनीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
मलकापूर : तालुक्यातील कुंड येथे इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थीनीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
माजी पंचायत समिती माजीबसदस्य मिलिंद पाचपांडे यांची कन्या ऋतुजा (वय १८) ही नुतन कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीला विज्ञान विभागात शिकत होती.
बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ऋतुजाला घाम आला व छातीत धडधड वाढल्यामुळे वडिलांनी तिला तात्काळ मलकापूरातील ह्रदयविकार तज्ञ डॉ. राजेंद्र फिरके यांच्या दवाखान्यात हलविले. मात्र तिची प्रक्रुती अत्यवस्थ झाल्याने तिला बुलढाणा रेफर करण्यात आले. वाटेतच रूतुजाची प्राणज्योत मालवली. दुपारी १ वाजता ऋतुजावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकसेवा शिक्षण बहूउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अरविंद कोलते यांच्या सूचनेवरून नुतन विद्यालय, कनिष्ट महाविद्यालय, जनता काँलेज , व्ही.बी.कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात सुट्टी जाहीर करण्यात आली. व अंत्यसंस्कारासाठी सर्व सहभागी झाले. सरपंच श्रीमती मथुराबाई तांबे यांनीही गावातील चिमुकलीच्या मृत्युबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
(तालुका प्रतिनीधी)