लक्ष्मीनगरमधील कन्या शाळा बनली कचरा घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:36 AM2021-05-08T04:36:41+5:302021-05-08T04:36:41+5:30
डोणगांव : येथील लक्ष्मी नगरात गत काही वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे, या भागातील कन्या शाळेत ...
डोणगांव : येथील लक्ष्मी नगरात गत काही वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे, या भागातील कन्या शाळेत ग्रामपंचातयने खरेदी केलेला प्लास्टीक कचरा टाकलेला आहे, तसेच या परिसरातील काही ग्रामस्थांनी शाळा परिसरात कचरा टाकणे सुरू केले आहे. त्यामुळे शाळा कचरा घर बनल्याचे चित्र आहे. या कचऱ्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.
डोणगांव येथील लक्ष्मीनगर हा मागील २० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आला आहे. या भागात मूलभूत सुविधा अद्यापही पोहोचलेल्या नाहीत. या भागात रस्ते, नाल्या, पथदिवे, नळाचे पाणी या सुविधा तर नाहीतच, तर दुसरीकडे या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या प्लास्टीक कचरा ज्यात कॅरिबॅग, प्लास्टीक आवरणे, प्लास्टीक पिशवी असा प्लास्टीक कचरा भरून ठेवला आहे, तसेच याच शाळेच्या प्रांगणात काही जणांनी उकिरडे टाकलेले आहे, तर बाजूलाच शिव मंदिर आहे. ज्या ठिकाणी उडालेला कचरा मंदिर परिसरात जाताे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे.
शासनाने बंद असलेली कन्या शाळा ताब्यात घेऊन तेथे स्वच्छता राबवावी़, तसेच पुन्हा या ठिकाणी शाळा सुरू करावी किंवा एखादे शासकीय कार्यालय सुरू करावे व परिसरातील जनतेला होणारा त्रास दूर करावा.
गजानन सातपुते, ग्रामस्थ लक्ष्मी नगर डोणगांव