राष्ट्रीय शुटिंग बाॅल स्पर्धेसाठी मुलीचा संघ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:32 AM2021-02-12T04:32:19+5:302021-02-12T04:32:19+5:30

येथील मुलीच्या शुटिंग बाॅल संघाने देऊळगाव राजा येथे झालेल्या राज्यस्तरीय शुटिंग बाॅल स्पर्धेमधे प्रदर्शन करत सर्व सामने जिंकून चषकावर ...

The girl's team left for the national shooting ball competition | राष्ट्रीय शुटिंग बाॅल स्पर्धेसाठी मुलीचा संघ रवाना

राष्ट्रीय शुटिंग बाॅल स्पर्धेसाठी मुलीचा संघ रवाना

googlenewsNext

येथील मुलीच्या शुटिंग बाॅल संघाने देऊळगाव राजा येथे झालेल्या राज्यस्तरीय शुटिंग बाॅल स्पर्धेमधे प्रदर्शन करत सर्व सामने जिंकून चषकावर अमडापूरचे नाव कोरले. येथील मुलींच्या संघाची राष्ट्रीय शुटिंग बाॅल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील मुलीच्या संघासह कोच शरद खाजभागे गाझियाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय शुटिंग बाॅल स्पर्धेसाठी अमडापूर येथून रवाना झाले आहेत. या संघासोबत विदर्भ सचिव शकिल काझी, कोषाध्यक्ष आप्पा राजे, प्रशिक्षक शरद खाजभागे याच्यासह मुली तन्ही शरद खाजभागे, नीलाक्षी अनिल पुरंदरे, नेहा अरुण काळे, मेघा सुकदेव ईरतकर, गौरी गजानन म्हस्के, ऋतुजा भारत खाजभागे, दिक्षा गणेश जाधव, जयश्रीताई कैलास नेमाडे यांचा समावेश आहे. या यशस्वी संघाचे माजी ग्रा. प. सदस्य रेखाताई खाजभागे, भारत खाजभागे, प्रल्हाद शेळके, अनिल पुरंदरे, प्रकाश खराडे, रवींद्र पाखरे, सुकदेव ईरतकर, विनोद सरसे, माधव धुंदळे, भारत खाजभागे यांनी कौतुक केले.

Web Title: The girl's team left for the national shooting ball competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.