गवताचे गठ्ठे तयार करणाऱ्या यंत्रासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:34+5:302021-01-02T04:28:34+5:30
विदर्भामधील उष्ण व अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे. तथापि, उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा भेटत नसल्याने पशुधनाला प्रोटीनयुक्त आहाराचा प्रचंड ...
विदर्भामधील उष्ण व अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे. तथापि, उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा भेटत नसल्याने पशुधनाला प्रोटीनयुक्त आहाराचा प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे दुग्ध उत्पादनात घट होऊन सकस आहाराअभावी पशूंची शारीरिक झीज होत आहे. केंद्र पुरस्कृत पशुधन विकास अभियानांतर्गत गवताचे गठ्ठे तयार करण्याचे यंत्र शेतकरी व पशुपालकांना उपलब्ध करून दिल्यास हिरव्या व कोवळा मका, बाजरी, ज्वारी, वैरण पिके तथा विविध प्रकारच्या गवतांचे गठ्ठे तयार करता येतील. उन्हाळ्यामध्ये व सिंचनाची व्यवस्था नसणाऱ्या शुष्क काळात व ठिकाणी पशूंना चारा उपलब्ध होईल, परिणामी दुग्ध उत्पादन वाढून नागरिकांच्या आहारामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होऊन शेतकरी व पशुपालकांच्या उत्पादनात भर टाकण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली व बुलडाणा तालुक्यामध्ये गवताचे गठ्ठे तयार करणारे यंत्र १०० टक्के अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी आमदार महाले यांनी नामदार सुनील केदार यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.