पावसासाठी ‘धोंडी धोंडी पाणी दे’चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:10 AM2017-08-10T00:10:47+5:302017-08-10T00:12:11+5:30
दुसरबीड : १५ ते २0 दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने पिके सुकत आहेत. त्यामुळे पावसासाठी येथील युवकांनी ५ ऑगस्ट रोजी घरोघरी जाऊन ‘धोंडी धोंडी पाणी दे.’ गजर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
दुसरबीड : १५ ते २0 दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने पिके सुकत आहेत. त्यामुळे पावसासाठी येथील युवकांनी ५ ऑगस्ट रोजी घरोघरी जाऊन ‘धोंडी धोंडी पाणी दे.’ गजर केला.
पावसाअभावी सोयाबीन, तूर, उडीद, मूग, तीळ आदी खरिपातील पिके सुकण्याच्या स्थितीत आहेत. पाऊस पडावा, यासाठी दारोदारी फिरून धोंडी धोंडी पाणी दे, असा गजर करून पाणी अंगावर घेण्याची प्रथा आहे. त्यासाठी युवकांनी दुसरबीड येथील घरोघरी जाऊन ‘धोंडी धोंडी पाणी दे.’ असा गजर केला. धो-धो पाऊस पडावा, यासाठी ईश्वराला साकडे घातले. यात सुनील शिंदे, शंकर शिंदे, अर्जुन शितोळे, आकाश सोळंके, तानाजी सावंतकर, गुनाजी शिकोळे या युवकांनी सहभाग घेऊन पाऊस पडण्यासाठी प्रार्थना केली.