पेनटाकळी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:32 AM2021-02-12T04:32:21+5:302021-02-12T04:32:21+5:30
पेनटाकळी प्रकल्प हा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असून, या प्रकल्पावर १४ हजार हेक्टर सिंचन अपेक्षित आहे. प्रकल्पाचे १०० टक्के काम ...
पेनटाकळी प्रकल्प हा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असून, या प्रकल्पावर १४ हजार हेक्टर सिंचन अपेक्षित आहे. प्रकल्पाचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून कालव्यांचीदेखील ९५ टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील चिखली तालुक्यातील मौजे घानमोड, मानमोड, देवदरी तसेच पांढरदेव येथील पुनर्वसनाची कामे अपूर्ण आहेत. प्रकल्पाचा ४१६ कोटी रुपयांचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे; मात्र, त्यास अद्यपही मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी व कालव्यांची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी आवश्यक आहे. याची दखल घेत प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेस मंजुरी प्रदान करण्यात यावी, अशी मागणी भारत बोंद्रे यांनी ना. जयंत पाटील यांची बुलडाणा दौऱ्यादरम्यान प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. यावेळी वल्लभराव देशमुख, शंतनु बोंद्रे, नंदू आंभोरे, रवी तांबट, रवी जाधव, शिवाजी वाघमारे, विलास वसू, अशोक पाटील, भागवत काकडे, रवी डाळीमकर, अनिल जाधव, अमोल जाधव, मदन वाघ, रवी घाडगे, अच्युतराव पाटील, बबन जाधव, बंडू जाधव, सुभाष जाधव, बबलू वाघ, अनिमन्यू जाधव, सुखदेव पाटील, वसंता पाटील, गजानन जाधव, संतोष जाधव, रामू झिने, शेख आझम, निबराव देशमुख, शेनफडराव धुबे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.