बुलडाणा जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या! - स्वाभिमानी शेतकरी संघटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 13:52 IST2018-02-15T13:48:58+5:302018-02-15T13:52:42+5:30
बुलडाणा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान ५० हजार रुपये आर्थिक मदत द्या, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाव्दारे दिला.

बुलडाणा जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या! - स्वाभिमानी शेतकरी संघटना
बुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतकऱ्यां चे हजारो हेक्टरवरील रब्बी पिकाचे प्नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान ५० हजार रुपये आर्थिक मदत द्या, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाव्दारे दिला. जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. गारपीटीमुळे शेतकºयांच्या कांदा, गहु, हरभरा, तूर, भाजीपाला व द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. शेतकºयांची ही पीके : जमीनदोस्त झाली. आधिच संकटात असलेल्या शेतकºयांवर अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ३५६ गावांना या गारपिटीचा फटका बसला. तर वीज पडुन एकाच मृत्यु झाला. राज्यातील हजारो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात अचानक झालेल्या या गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी निवेदनाव्दारे दिला.