दे. राजा तालुक्याचा ९५.९८ टक्के निकाल
By admin | Published: May 31, 2017 12:20 AM2017-05-31T00:20:52+5:302017-05-31T00:20:52+5:30
पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ४५ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेबु्रवारी-मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार ३० मे रोजी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. त्यात देऊळगावराजा तालुक्याचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९५.९८ टक्के लागला असून, रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल ४५.०० टक्के तर एकूण निकाल ९५.९८ टक्के लागला आहे.
देऊळगाव राजा तालुक्यात १७ उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामार्फत १४७२ नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांच्यापैकी १४०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ९५.९८ इतकी असून ४० विद्यार्थी रिपीटर यापैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ४५.०० टक्के आली आहे. नियमित उर्त्तीर्ण झालेल्या १४७२ विद्यार्थ्यांमध्ये ८६८ मुले व ५३९ मुलींचा समावेश असून, त्यांची टक्केवारी ९५.४९ (विद्यार्थी) तर ९५.७४ (विद्यार्थीनी) इतकी आहे. तालुक्याची टक्केवारी वाढली असून, ९५.९८ टक्के निकाल लागला आहे. तर तालुक्यातील 6 विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेसाठी देऊळगावराजा हायस्कूल विज्ञानचा १०० टक्के, कला ९८.२७ टक्के, एमसीव्हीसी ९४.४३ निकालाची परंपरा कायम ठेवून विज्ञानमध्ये प्रथम क्रमांकावर प्राजक्ता अंबुस्कर ८४.४६, कलामध्ये प्रथम क्रमांकावर शिवदास दांडगे ८८.३०, एमआरडीएमध्ये प्रथम ऋषिकेश शिंदे यांनी ८३.३८ तसेच क्रॉपसायन्समध्ये प्रथम ओम कांकाळ यांनी ८१.८४ गुण प्राप्त केले. व्यंकटेश कनिष्ट व विज्ञान महाविद्यालय कला ८९.४१ टक्के , विज्ञान ९४ टक्के वाणिज्य शाखेतून पूजा सोनूने हिने ९० टक्के गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकविला, तसेच कला शाखेतून बाबासाहेब खंदारे ८२.४६ गुण मिळून टाप ठरला, म्यु.श्री शिवाजी हायस्कूल ९०.४८ मधून शिवाणी निरफळे हिने ८३.६९ टक्के घेऊन प्रथम क्रामांक पटकविला व उर्दू विभागाचा ९५ टक्के त्यातून निकत परविन हिने ७८.४६ गुण प्राप्त केले, दीनदयाळ विद्यालय कला शाखेतून ९७.१४ टक्के, विज्ञान शाखेत ९८.५२ टक्के, आमेना अजीज उर्दू हायस्कूल ८०.०० टक्के, देऊळगावमही येथील मौलाना आझाद ज्यूनियर कॉलेज विज्ञान शाखेतून १००.०० टक्के तसेच कला शाखेतून ९३.३०, शिवाजी कनिष्ट विद्यालय १०० टक्के, स्वामी विवेकानंद विद्यालय १०० टक्के, यशवंत आटर्स ज्यूनियर कॉलेज डिग्रस ७८.८४ टक्के , श्री औंढेश्वर ज्यूनियर कॉलेज अंढेरा ८१.०० टक्के, श्री शिवाजी हायर सेकंड्री स्कूल पिंपळगाव १०० टक्के, महात्मा जोतीबा फुले ज्यूनियर कॉलेज १०० टक्के, सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे हायर सेकंड्री स्कूल खल्याळ गव्हाण १०० टक्के, आदर्श ज्यूनियर कॉलेज सिनगाव जाँ. १००.०० टक्के, कै.यशवंतराव पाटील कला महाविद्यालय शिवणी ९५.०० टक्के, समर्थ हायर सेकंड्री पांर्गी १०० टक्के, निकाल लागला आहे.