शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:38 AM2021-09-05T04:38:43+5:302021-09-05T04:38:43+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील १ एप्रिल २०१२ पासून ३१ मार्च २०१६ या काळात कर्ज घेतलेल्या आणि ३० जून २०१६ पर्यंत थकीत ...
बुलडाणा जिल्ह्यातील १ एप्रिल २०१२ पासून ३१ मार्च २०१६ या काळात कर्ज घेतलेल्या आणि ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या १.५० लाख रुपयांपर्यंतचे २ लाख ४१ हजार ७४३ कर्जदार शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र होते. त्यापैकी १ लाख ९३ हजार ७४४ शेतकऱ्यांना १०५४.१६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे; परंतु या अंतर्गत पात्र असूनही ४७ हजार ९९९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. हीच स्थिती इतर जिल्ह्यांची आहे. याबाबतचे पोर्टलदेखील बंद असल्याने पात्र असूनही वंचित शेतकऱ्यांच्या कर्जावर बोजा वाढत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचे पोर्टल तातडीने सुरू करून २०१२ ते २०१६ या दरम्यानच्या थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी आ. महाले यांनी यावेळी केली.
२४६१५ पात्र शेतकरी वंचित
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या दरम्यान कर्ज घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असलेल्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीस २४ हजार ६१५ शेतकरीदेखील पात्र असून, वंचित असल्याची बाब आ. महालेंनी ना. पाटील यांच्या निदर्शनास आणून देत दोन्ही कर्जमाफी योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.