मागासवर्गीय मुलींच्या नवीन वस्तिगृहांना माई रमाई आंबेडकर यांचे नाव द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 07:57 PM2017-08-14T19:57:44+5:302017-08-14T19:57:44+5:30
बुलडाणा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये मागासवर्गीय मुलींचे ५० वसतिगृह महाराष्ट्र शासनाने मंजूर केले असून त्या सर्व वसतिगृहांना माई रमाई भिमराव आंबेडकर यांचे नाव विशेष बाब म्हणून देण्यात यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना १० आॅगस्ट रोजी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राज्य प्रवक्ता पुरुषोत्तम बोर्डे यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांनी मोठ्या उत्साहात देशभर व राज्यात विविध कार्यक्रम राबवून व अनेक नव्या योजना सुरु करुन समाजामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व समता, स्वातंत्र्य, बंधुभाव निर्माण होवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सामाजिक न्याय पोहोचला पाहिजे. अशा बाबासाहेबांना वर्षभर विविध कार्यक्रम राबवून गौरव केला आहे. याच बाबासाहेबांना अगदी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून असंख्य अटी अडचणींना तोंड देवून कुटुंबाची व घराची जबाबदारी समर्थपणे संभाळून बाबासाहेबांना कोणत्याही प्रकारची अडचण माई रमाई आंबेडकर यांनी कधीच पुढे केली नव्हती. अशा माई रमाई आंबेडकरांचा महाराष्ट्र शासनने सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाºया मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहांना तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यात सुरु करण्यात आलेल्या एकूण ५० वसतिगृहांना विशेष बाब म्हणून माई रमाई भिमराव आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह असे नामकरण करण्यात यावे, जेणेकरुन अशा माऊलीचा बाबासाहेबांसोबतच गौरव होईल. यासाठी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना १० आॅगस्ट रोजी निवेदन दिले आहे. निवेदनावर राज्य प्रवक्ता पुरुषोत्तम बोर्डे, इंजि.शिवाजी जोहरे, समाधान चिंचोले, के.एम.वैरी, प्रमिलाताई चिंचोले, सचिन चंद्रे, प्रकाश डोंगरे, यशपाल लहाने, शरद खरात, मनोहर खराडे, विलास खंडेराव, संघमित्रा कस्तुरे, रमेश मिसाळ, प्रदीप जाधव आदींच्या सह्या आहेत.