योग्य पीक विमा द्या, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2016 01:50 AM2016-09-12T01:50:24+5:302016-09-12T01:50:24+5:30

नांदुरा तालुक्यातील बहुतांश शेतक-यांना सोयाबीनचा अल्य पीक विमा मिळाल्याने आंदोलनाचा ‘स्वाभिमानी’ संघटनेद्वारे इशारा देण्यात आला.

Give the right crop insurance, otherwise the movement | योग्य पीक विमा द्या, अन्यथा आंदोलन

योग्य पीक विमा द्या, अन्यथा आंदोलन

Next

खामगाव(जि. बुलडाणा), दि. ११: : नांदुरा तालुक्यामध्ये ११ हजारांच्यावर शेतकर्‍यांना सोयाबीनचा पीक विमा हा एकरी फक्त २८ रुपये इतका मिळाला आहे. तेव्हा शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी तसेच दोषी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत संबंधितांना शनिवारी दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे, की शेतकर्‍यांना पीक विमा मोबदल्यापोटी एकरी फक्त २८ रुपयांप्रमाणे पीक विमा मंजूर झाला आहे. ही शेतकर्‍यांची एकप्रकारे चेष्टा आहे. याबाबत न्याय मागितला असता जिल्हा कृषी अधीक्षकांकडून हाच पीक विमा योग्य असल्याचे सांगितल्या जाते. यासाठी अधिकार्‍यांची चूक असताना खापर मात्र शासनावर फुटत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नुकसानास जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर जोपर्यंत कठोर कारवाई होऊन निलंबन न झाल्यास शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी स्वाभिमानी स्टाइलने उत्तर देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी या निवेदनातून दिला आहे. प्रतिलिपी संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.

Web Title: Give the right crop insurance, otherwise the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.