डोणगाव येथे पशुवैद्यकीय अधिकारी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:11+5:302021-07-22T04:22:11+5:30
डोणगाव : मेहकर तालुक्यातील सर्वात माेठे गाव असलेल्या डाेणगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. हे पद तातडीने भरण्याची ...
डोणगाव : मेहकर तालुक्यातील सर्वात माेठे गाव असलेल्या डाेणगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. हे पद तातडीने भरण्याची मागणी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेष सावजी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदवनात केली आहे.
डाेणगाव जिल्ह्यातील मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषदेचे कृषी सभापतींचे गाव असून, शेतीचेही क्षेत्रफळ जास्त आहे़. सोबतच आजूबाजूच्या गावांची संख्याही बरीच आहे़. परिसरात पाळीव जनावरांची संख्यादेखील माेठ्या प्रमाणात आहे. गावामध्ये आठ ते दहा ठिकाणी दूध विक्री केंद्राच्या माध्यमातून दूध विक्री होत असते. डोणगाव येथील रुग्णालयात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्तच आहे. येथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात येत असल्याने अर्ध्यापेक्षा अधिक काळ त्यांना त्यांच्या मूळ पदावर कार्यरत राहावे लागते. त्यामुळे पशुपालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे डोणगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी शैलेश सावजी यांनी निवेदनात केली आहे.