महामारीच्या या काळातील अधिवेशन जगण्याची ऊर्जा देणारे : कुलगुरू चांदेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:33 AM2021-05-01T04:33:27+5:302021-05-01T04:33:27+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे ३४ वे अधिवेशन ऑनलाईन पद्धतीने २९ एप्रिल रोजी कुलगुरू डॉ. चांदेकर यांच्या ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे ३४ वे अधिवेशन ऑनलाईन पद्धतीने २९ एप्रिल रोजी कुलगुरू डॉ. चांदेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. शि.प्र.मं.चे तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालय चिखलीव्दारे आयोजित अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता रामकृष्ण शेटे यांच्या अध्यक्षतेत पार पडले. अधिवेशनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी 'नवीन तंत्र शिक्षण व्यवस्थेने स्वीकारले पाहिजे. कोरोना काळात अभ्यासक्रमात बदल करून नवनिर्मिती केल्या गेली पाहिजे असे मत व्यक्त केले. तर मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पवन मांडवकर यांनी अधिवेशनाची भूमिका विशद केली. स्वागताध्यक्ष का. प्राचार्य डॉ. सुभाष गव्हाणे यांनी प्रास्तविक केले. सुरुवातीला भाषा व साहित्य या क्षेत्रातील गुरू व मार्गदर्शक ज्येष्ठ समिक्षक दिवंगत डॉ. आशा सावदेकर, डॉ. सत्येश्वर मोरे, डॉ. गणेश टाले, डॉ. गौतम अंभोरे, डॉ. विजय वाघमारे व डॉ. पोहकार यांच्याप्रति शोक संवेदना व्यक्त करण्यात आल्या. प्रथम सत्रात 'आभासी पद्धतीने मराठीचे अध्ययन एक समस्या व उपाय' या विषयावर गोवा विद्यापीठाचे प्रा. प्रमोद पवार यांनी विचार व्यक्त केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. अलका गायकवाड होत्या. दुसऱ्या सत्रात 'कोविड काळात परीक्षेची आवश्यकता व कार्यपद्धती' या विषयावर डॉ. संजय करंदीकर महाराज सयाजी विद्यापीठ बडोदा यांनी प्रकाश टाकला. अध्यक्षस्थानी डॉ. ममता इंगोले होत्या. तर समारोपीय सत्रात डॉ. मनोज तायडे यांनी अधिवेशनाचा आढावा घेतला. अध्यक्षस्थानी शि.प्र.मं.चे सचिव प्रेमराज भाला होते. सूत्रसंचालन अधिवेशनाचे आयोजक सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रफुल्ल गवई, डॉ. गोविंद गायकी, डॉ. विलास भवरे, तर तर आभार डॉ. गजानन मुंडे, प्रा. डॉ. प्रदीप बारड, डॉ. सुवर्णा गाडगे यांनी मानले. यशस्वीतेसाठी म. प्रा. परिषदेचे अध्यक्ष डॉ. पवन मांडवकर, सचिव डॉ. राजू आदे व आयोजन समिती सदस्य डॉ. केदार ठोसर, प्रा. विजय वाकोडे, डॉ. बाळकृष्ण इंगळे, डॉ. नागेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले.