शेगांवात दोन घोड्यांच्या रक्तजलमध्ये आढळले ग्लॅंडर्संचे जिवाणू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 07:57 PM2017-10-04T19:57:41+5:302017-10-04T19:58:16+5:30
बुलडाणा- जिल्ह्यात शेगाव येथील दोन घोड्यांच्या रक्तजल नमुन्यांमध्ये ग्लॅंडर रोगासाठी पॉझीटीव्ह असणारे जिवाणू आढळून आली आहेत. हरीयाणामधील हिस्सार येथे असलेल्या नॅशनल ईक्वॉइन रिसर्च सेंटर, (राष्ट्रीय अश्व संशोधन संस्था) यांच्याकडे पशुसंवर्धन विभागाकडून 26 नमुने जिल्ह्यातील घोड्यांचे पाठविण्यात आले होते. त्यापेकी दोन नमुने पॉझीटीव्ह आढळले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा- जिल्ह्यात शेगाव येथील दोन घोड्यांच्या रक्तजल नमुन्यांमध्ये ग्लॅंडर रोगासाठी पॉझीटीव्ह असणारे जिवाणू आढळून आली आहेत. हरीयाणामधील हिस्सार येथे असलेल्या नॅशनल ईक्वॉइन रिसर्च सेंटर, (राष्ट्रीय अश्व संशोधन संस्था) यांच्याकडे पशुसंवर्धन विभागाकडून 26 नमुने जिल्ह्यातील घोड्यांचे पाठविण्यात आले होते. त्यापेकी दोन नमुने पॉझीटीव्ह आढळले आहेत. ग्लॅंडर हा रोग अश्ववर्गीय प्राण्यांमध्ये असतो. या रोगाचा प्रादुर्भाव घोड्यांमधून मनुष्यामध्ये होतो. हा रोग 2009 च्या प्रीव्हेंशन अँण्ड कन्ट्रोल ऑफ इन्फेक्शन अँण्ड कॉन्टॅजीयस डिसीजेस इन ॲनीमल या कायद्यातंर्गत अधिसूचीत करण्यात आलेला आहे. मानवास प्राणघातक रोग असल्यामुळे गंभीरता लक्षात घेता रोग फैलावणार नाही, या दृष्टीकोनातून व सदर कायद्याच्या कलम 7 अन्वये जिल्ह्यातील अश्ववर्गीय जनावरांची वाहतुक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
जिल्ह्यात अश्ववर्गीय जनावरांची वाहतूक करणे व जिल्ह्याबाहेरील अश्ववर्गीय प्राणी जसे घोडा, खेचरे व गाढव प्राणी जिल्ह्यात येणार नाहीत, याबाबत मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात संपूर्णपणे अश्ववर्गीय जनावरांच्या होणाऱ्या वाहतूकीस जिल्हाधिकारी यांनी निर्बंध घातले आहे. जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांमधून येणाऱ्या व जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात होणाऱ्या अश्ववर्गीय जनावरांच्या वाहतुकीससुद्धा निर्बंध घालण्यात येत आहे. सदर आदेश 31 डिसेंबर 2017 पर्यंत लागू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.