आदिवासी पट्ट्यात निमोनियामुळे बकऱ्यांचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 06:38 PM2020-04-20T18:38:29+5:302020-04-20T18:39:19+5:30

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील बकºया या निमोनिया आजाराने ग्रस्त व अत्यवस्थ आहेत.

Goat dies of pneumonia in tribal belt! | आदिवासी पट्ट्यात निमोनियामुळे बकऱ्यांचा मृत्यू!

आदिवासी पट्ट्यात निमोनियामुळे बकऱ्यांचा मृत्यू!

googlenewsNext

बुलडाणा: कोरोना हॉटस्पॉटमध्ये समाविष्ठ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या चाळीस टपरी व परिसरातील आदिवासी पाड्यांवरील बकऱ्यां निमोनिया आजार होऊन  मृत्यूमुखी पडत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आदिवासी  •ाागात घबराट निर्माण झाली आहे. सोबतच आदिवासींंच्या पशुधनाची हानी होत आहे.
या प्रश्नी बुलडाण्याचे  माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बोरकर, जळगाव जामोदचे उपवि•ाागीय अधिकारी यांना एक निवेदन देऊन या बकऱ्यांची पाहणी करून त्यांचेही स्वॅब नमुने घेण्यात येऊन त्यांची तपासणी  करण्याची मागणी केली आहे. सोबतच पशुधनाची हानी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील बकºया या निमोनिया आजाराने ग्रस्त व अत्यवस्थ आहेत. काही बकऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या साथीच्या पार्श्व•ाूमीवर तथा अमेरिकेत एका वाघाला कोरोना सदृश्य आजाराची लागन झाल्याच्या पार्श्व•ाूमीवर या बाबीकडेही गं•ाीरतेने पाहण्याची गरज असल्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हंटले आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग हा प्राण्यांकडून माणसाकडे आला असल्याची शक्यताही तज्ज्ञ वैज्ञानिक, संशोधक आणि डॉक्टरांकडून व्यक्त केल्या जात आहे. तर काहींनी माणसाकडूनही तो प्राण्यांकडे  संक्रमीत होत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यातच जळगाव जामोदमधील चाळीस टपरी आदिवासी पाड्यावरील बकऱ्या या निमोनिया, सर्दी, ताप या सारख्या आजाराने ग्रस्त असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे  विषयाची गं•ाीरता  पाहता या प्रश्नी तातडीने उपाययोजना करून या आजाराचे विश्लेषण करून येथील बकºयांच्या उपचारासाठी पथक पाठविण्यात येऊन  त्यांचे स्वॅब नमुने घेऊन तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आ. सपकाळ यांनी केली आहे.
 
चाळीस टपरी पाड्यावर जावून बकऱ्यांमध्ये असलेल्या या आजाराची पाहणी करण्यात येईल.  सोबतच त्याचे स्वॅब नमुनेही तपासणी करण्यात येतील. प्रत्यक्ष पाहणी अंती याबाबत बोलता येईल.
- डॉ. पी. जी. बोरकर, पशुसंवर्धन उपायुक्त, बुलडाणा

 कोरोनाचे तीन प्रकार 
प्रामुख्याने कोरोना व्हायरसचे तीन प्रकार असल्याचे सांगण्यात येते. यात एक माणसामध्ये आढळणारा कोरोना व्हायरस, दुसरा कॅनाईन कोरोना व्हायरस हा प्रामुख्याने कुत्र्यांमध्ये आढळतो आणि बोव्हाईन कोरोना हा गायी, म्हशींमध्ये आढळतो. तीनही व्हायरस मायक्रोस्कोपमध्ये ९० टक्के सारखेच दिसतात. पण त्यांची रोगकारक शक्ती आणि टार्गेट ग्रुप वेगवेगळे असतात, असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.  पी.जी. बोरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शेळ््या, मेंढ्यांमध्ये साधारणत: असा व्हायरस आढळत नाही. मात्र प्रत्यक्ष पाहणी अंती याबाबत बोलता येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: Goat dies of pneumonia in tribal belt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.