रायपूर परिसरातील शेळ्या लंपास करणारी टाेळी गजाआड
By संदीप वानखेडे | Published: September 28, 2023 04:27 PM2023-09-28T16:27:46+5:302023-09-28T16:28:27+5:30
बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील शगीर खा शबीर खा यांच्या शेतातील गाेठ्यातून २३ सप्टेंबर राेजी रात्री अज्ञात चाेरट्यांनी चार शेळ्या आणि दाेन बाेकड किंमत ५७ हजार रुपये लंपास केले हाेते.
पिंपळगाव सराई : रायपूर परिसराती शेळ्या लंपास करणाऱ्या टाेळीला गजाआड करण्यास पाेलिसांना २७ सप्टेंबर राेजी यश आले आहे.या प्रकरणातील एकास पाेलिसांनी अटक केली असून दाेन आराेपी फरार झाले आहेत. पाेलिसांनी आराेपीकडून चाेरी गेलेल्या शेळ्या जप्त केल्या आहेत. या चाेरट्यांच्या अटकेमुळे जिल्ह्यातील इतर चाेरीचे गुन्हेही उघड हाेण्याची शक्यता आहे.
बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील शगीर खा शबीर खा यांच्या शेतातील गाेठ्यातून २३ सप्टेंबर राेजी रात्री अज्ञात चाेरट्यांनी चार शेळ्या आणि दाेन बाेकड किंमत ५७ हजार रुपये लंपास केले हाेते. या प्रकरणी रायपूर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला हाेता. बुलढाणा पाेलीस अधीक्षक सुनील कडासणे, अप्पर पाेलीस अधीक्षक बी. बी.महामुनी यांच्या आदेशाने रायपूरचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनात हेकाॅ राजेश गवई , आशीष काकडे, राजीव गव्हाणे, अरुण झाल्टे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या परिसरातील शेळ्या भाेकरदन तालुक्यातील चाेरट्यांनी लंपास केल्याची गुप्त माहिती पाेलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पाेलिसांनी शिरसगाव मंडप येथे धाड टाकून आराेपी साहिल मुक्तार शहा यास ताब्यात घेतले. त्याला पाेलीसी खाक्या दाखवताच शेळ्या लंपास केल्याची कबुली दिली. पाेलिसांनी त्याच्याकडून चाेरी गेलेल्या शेळ्या जप्त केल्या. आराेपीला बुलढाणा न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे.चाेरीमध्ये सहभागी असलेले दाेन आराेपी फरार झाले आहेत.या प्रकरणातील आराेपींना अटक केल्यामुळे परिसरातील चाेरीच्या घटना उडकीस येण्याची शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली आहे.