कोथळी येथे बकरी चोरट्यांना नागरिकांनी पकडले, संतप्त जमावाकडून चोरट्यांना चोप

By निलेश जोशी | Published: May 16, 2024 09:37 PM2024-05-16T21:37:32+5:302024-05-16T21:37:54+5:30

बकऱ्या चोरणाऱ्या तीन जणांना चोपले, गाडीचीही तोडफोड

Goat thieves caught by citizens at Kothali, thieves beaten by angry mob | कोथळी येथे बकरी चोरट्यांना नागरिकांनी पकडले, संतप्त जमावाकडून चोरट्यांना चोप

कोथळी येथे बकरी चोरट्यांना नागरिकांनी पकडले, संतप्त जमावाकडून चोरट्यांना चोप

नीलेश जाेशी, बुलढाणा-मोताळा: बकऱ्या चोरणाऱ्या तीन जणांना १६ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास कोथळी येथे नागरिकांनी पकडले. यावेळी तिघांना संतप्त नागरिकांनी चोप देत बकऱ्या घेऊन जाणाऱ्या कारची तोडफोड केली. त्यानंतर चोरट्यांना बोराखेडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी फिर्यादीवरून बोराखेडी पोलीसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कोथळी येथे १६ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास खामगाव तालुक्यातील चितोडा येथील सुरज आनंदा हिवराळे, आशिष रवींद्र वानखेडे, रविकांत जनार्दन हिवराळे हे तीन चोरटे स्विफ्ट डिझायर कार मधून बकऱ्या चोरी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कोथळी येथील शे. जावेद शे. रशीद यांची बकरी चोरी करून स्विफ्ट डिझायर कार मध्ये घेऊन जातांना चिंतामणी मंदिराजवळ नागरिकांनी पाहिले. तेव्हा त्यांना थांबवून संतप्त नागरिकांनी चोप देत चोरीची बकरी घेऊन जाणाऱ्या कारची तोडफोड केली.

बकरी मालक शे. जावेद यांना फोनवरून माहितीही देण्यात आली. बकरी मालक यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता त्या कार मधील बकरी ही त्यांची दिसून आली. सदर माहिती बोराखेडी पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तिघांना वाहणासह ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी कोथळी येथील शे. जावेद शे. रशीद यांनी बोराखेडी पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी सुरज हिवराळे, आशिष वानखेडे आणी रविकांत हिवराळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत तायडे आणी पोलिस कॉन्स्टेबल सनुील भवटे हे करीत आहेत.

Web Title: Goat thieves caught by citizens at Kothali, thieves beaten by angry mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.