जंगली श्वापदाने फस्त केली बकऱ्यांची पिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 10:26 AM2021-06-26T10:26:03+5:302021-06-26T10:26:16+5:30
Goats hatched by wild beasts : लक्ष्मण जगदेव वानखडे यांच्या मालकीच्या गोठ्यात बांधलेली बकरीची ७ ते ८ पिल्ले जंगली जनावराने मारून फस्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: तालुक्यातील ग्राम खेर्डा बु येथील शेतमजूर लक्ष्मण जगदेव वानखडे यांच्या मालकीच्या गोठ्यात बांधलेली बकरीची ७ ते ८ पिल्ले जंगली जनावराने मारून फस्त केली.सदर घटना दिनांक २५ जून चे रात्री घडली.
गावांमध्येच राहत्या घरापासून सात ते आठ घराच्या अंतरावर गोठा आहे. गोठ्यामध्ये ६ मोठ्या बकऱ्या आणि ८ पिल्ले होती. मागच्या बाजूने शेत आहे. त्या मार्गाने जंगली जनावराने गोठ्याच्या कुळातून घुसून पिल्लांना मारून टाकले. त्यांचा बाहेर जाऊन फडशा पाडला. सकाळी लक्षात आल्यानंतर धावाधाव केली असता सहा किल्ले मेलेल्या अवस्थेत आजूबाजूच्या शेतात दिसली. त्यामध्ये काहींची पोटे फाडलेली होती. तर काहींचे केवळ मुंडके होते. त्यामुळे जंगली जनावर नेमके कोणते होते याबाबत शंका-कुशंका असून तडसे किंवा बिबट्या असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सदर शेतमजुराचे मोठे नुकसान झाले. वन विभागाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. तर जंगली जनावराने गावात घुसून पिल्ले खाल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाने दखल घेण्याची गरज आहे.