साध्याभोळ्या देवासारखे त्याचे भक्तही साधेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:27 PM2018-07-22T12:27:03+5:302018-07-22T12:29:22+5:30

बुलडाणा : आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महिना ते दीड महिना पायी वारी करून पंढरपूरला जाणाºया पालखी सोहळ्यातील वारकºयांच्या सुविधांची वाणवा जाणवत आहे.

Like a god his devotee is simple! | साध्याभोळ्या देवासारखे त्याचे भक्तही साधेच!

साध्याभोळ्या देवासारखे त्याचे भक्तही साधेच!

googlenewsNext
ठळक मुद्दे मानाच्या पहिल्या दोन पालख्या वगळता इतर मानाचे पालखी सोहळे दुर्लक्षीत राहत असल्याने  साध्याभोळ्या देवासारखे त्याचे भक्तही साधेच दिसून येत आहे.   दशमीला दुपारी सर्वात पुढे संत नामदेवांची पालखी तर त्यामागोमाग हे सर्व पालखी सोहळे पंढरपूरला येतात.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा : आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महिना ते दीड महिना पायी वारी करून पंढरपूरला जाणाºया पालखी सोहळ्यातील वारकºयांच्या सुविधांची वाणवा जाणवत आहे. दिंडी मार्गावरील रस्ते दुरूस्ती, निवारा, पंढरपूरचे वाळवंट, वारकºयांच्या मुक्कामाचे प्रत्येक ठिकाण, आरोग्य सुविधा यासारख्या बाबींकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्रातील मानाच्या पहिल्या दोन पालख्या वगळता इतर मानाचे पालखी सोहळे दुर्लक्षीत राहत असल्याने  साध्याभोळ्या देवासारखे त्याचे भक्तही साधेच दिसून येत आहे.  

 महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीच्या वाटेवर शेकडो वर्षापासून वारकऱ्यांच्या दिंढ्या जात आहेत. आषाढी एकादशीला मजल दरमजलवरून येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये पिढ्यानपिढ्या चालतात. महाराष्ट्रात मानाच्या सात पालख्या मानल्या जातात. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर (आळंदी ते पंढरपूर), संत तुकाराम (देहू ते पंढरपूर), संत एकनाथ (पैठण ते पंढरपूर), संत निवृत्तीनाथ (त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर), संत सोपानकाका (सासवड ते पंढरपूर), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर ते पंढरपूर), संत निळोबाराय (पिंपळनेर ते पंढरपूर) या पालखी सोहळ्यांचा समावेश आहे. हे सर्व पालखी सोहळे नावमीच्या दिवशी वाखरी पालखी तळावर मुक्कामी येतात. दशमीला पंढरपूरहून संत नामदेव महाराजांची पालखी या सर्व मानाच्या सात पालख्यांना आणण्यासाठी सामोरी जाते. दशमीला दुपारी सर्वात पुढे संत नामदेवांची पालखी तर त्यामागोमाग हे सर्व पालखी सोहळे पंढरपूरला येतात. सर्वात शेवटी पहिल्यामानाची म्हणजे संत ज्ञानेश्वरांची पालखी रात्री आठच्या दरम्यान पंढरपूरात प्रवेश करते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मंदिर समितीच्यावतीने या सर्व पालखी सोहळ्यांना त्यांच्या मानाच्या क्रमाने सत्कार, प्रसाद आणि पारंपारिक पूजन केले जाते. या सर्व पालखी सोहळ्यांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात सुमारे चार लाख तर संत तुकारामांच्यसा पाखली सोहळ्यात सुमारे तीन लाख भाविक सहभागी असतात. तर इतर सर्व मानाचे पालखी सोहळ्यात प्रत्येकी सुमारे एक लाखाच्या आत वारकरी सहभागी असतात. संख्येच्या दृष्टीने तुलनेने संत ज्ञानोबाराय व तुकोबाराय यांचे पालखी सोहळे मोठे असल्यामुळे प्रशासन व शासनाचे सर्व लक्ष या दोन सोहळ्यांकडेच केंद्रित होते; मात्र इतर सर्व पालखी सोहळे दुर्लक्षीतच राहत आहेत. शासन व प्रशासनाच्यावतीने दिंडी मार्गावरील विविध सुविधा, रस्ते दुरूस्ती, रस्ते रुंदिकरण, पालखी विसाव्यांचे बांधकाम, जमीन अधिग्रहण, पाणीपुरवठा, स्वच्छता, शौचालयांची (फिरत्या) व्यवस्था, वारकऱ्यांची आरोग्य सुविधा  आदी बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. मुलभूत सुविधा मिळत नसल्याची ओरड सोहळा प्रमुखांची दरवर्षी राहते. 


नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचा खर्च

नाशिक येथे भरणाºया कुंभमेळ्यासाठी शासनाकडून ३ हजार कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात येतो. मात्र, कुंभमेळ्याप्रमाणे जिथे जास्त गर्दी होते त्या वारीकडे शासनाचे दुर्लक्ष  दिसून येते. दिंडीत चालणाऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्याला रस्त्यात निवारा, पाणी, शौचालय आदी मूलभूत गोष्टी सुद्धा दिल्या जात नाही. त्यांच्यासाठी सुसज्ज वाहनतळ, लाखो लोकांच्या स्वच्छतागृहाची सोय, चांगली निवासव्यवस्था आणि मोठे रुग्णालय उभारणे गरजेचे आहे. 

  

वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न 

दिंडीतील वाटचाल ते झोप ही वारकऱ्यांची सगळीच कामे उघड्यावर होतात, पण त्यातुलनेत त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिल्या जात नाही. दिंडीतील वारकºयांचा अपघात होण्याच्या घटना वारंवार घडतात. अशा अपघातामध्ये आतापर्यंत अनेक वारकºयांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. ५ फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यातील बाळापूर-पातूर मार्गावर पायदळ वारीतील चार वारकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा अपघाताच्या घटनांमुळे वारकºयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. 


अनेक पालख्या डोंगरदऱ्यातून जातात. काही मार्गांची दूरवस्था झालेली असल्याने अडचणी येतात. पालखीतील वारकºयांना  वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नाही. पाण्याच्या टँकरची कमतरता भासते. पोलिस संरक्षण दिल्या जात नाही. त्यामुळे याकडे लक्ष देवून मानाच्या पालख्यांनातरी निधी देवून विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. 

- रघुनाथबुवा गोसावी,  संत एकनाथ पालखी सोहळा प्रमुख, पैठण ते पंढरपूर.

Web Title: Like a god his devotee is simple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.