कापड दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान

By निलेश जोशी | Published: September 12, 2023 06:31 PM2023-09-12T18:31:27+5:302023-09-12T18:31:46+5:30

चिखली येथील एका कापड दुकानाच्या गोडाऊनला १२ सप्टेंबरच्या दुपारी भीषण आग लागून त्यात लाखो रुपये किंमतीचा माल भस्मसात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Godown of cloth store caught fire Millions of losses | कापड दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान

कापड दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान

googlenewsNext

चिखली (बुलढाणा) : येथील एका कापड दुकानाच्या गोडाऊनला १२ सप्टेंबरच्या दुपारी भीषण आग लागून त्यात लाखो रुपये किंमतीचा माल भस्मसात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरात दहिगाववाला कापड दुकान या नावे कपड्यांचे मोठे दालन आहे. या दुकानाचे मालक सौरभ जैन यांनी आगामी सण-उत्सवासाठी नवीन माल बोलविला होता. हा माल शहरातील एका हॉस्पीटल नजीक असलेल्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. दरम्यान १२ सप्टेंबर रोज दुपारी अचानकपणे या गोडाऊनला आग लागली. 

गोडाऊनममधून धूर निघत असल्याने परिसरातील नागरिकांनी सांगितल्यानंतर गोडाऊनचे शटर उघडण्यात आले. तेव्हा दुकानातील कपड्यांच्या गठानींना आग लागल्याचे समोर आले. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर कपडे व प्लास्टीक असल्याने या आगीने रौद्ररूप धारण केले. धुराचे मोठे लोळ उठले होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी परिसरातील नागरीकांनी शिंदे हॉस्पीटलमधील अग्नीशमन यंत्रणेव्दारे आग विझण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान नगर पालिकेची अग्नीशमन यंत्रणा देखील घटनास्थळी दाखल झाली. अग्नीशमन यंत्रणेने प्रयत्नपूर्वक या आगीवर नियंत्रण मिळविले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संग्राम पाटील घटनास्थळी दाखल झाले होते. आग विझविण्यासाठी अनेक नागरीकांनी पुढाकार घेतल्याचे याठिकाणी दिसून आले. तसेच बघ्यांचीही मोठी गर्दीही येथे झाली होती. लाखो रुपयांचे नुकसान या आगीत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली असावी असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Godown of cloth store caught fire Millions of losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.