रोहिणखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गो-हा ठार
By admin | Published: January 16, 2017 02:02 AM2017-01-16T02:02:58+5:302017-01-16T02:02:58+5:30
भीतीचे वातावरण; वन विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला.
मोताळा, दि. १५- तालुक्यातील रोहिणखेड शिवारात शनिवारी रात्री शेतकर्याच्या शेतातील गोठय़ावर बिबट्याने हल्ला करून एक वर्ष वयाच्या गोर्हय़ाला ठार मारले. या हल्ल्यात शेतकर्याचे नुकसान झाले असून, परिसरात बिबट्या अवतरल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
दयाराम ङ्म्रीराम राजनकर यांनी रोहिणखेड शिवारातील नळगंगा नदीच्या काठावर जनावरांचा गोठा बांधलेला आहे. या गोठय़ात शनिवारी रात्री काही जनावरे बाहेर, तर काही आत बांधलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठय़ाचा झपाटा तोडत आत प्रवेश करून गोर्हा फस्त केला. १५ जानेवारी रोजी सकाळी दयाराम राजनकर चारा-पाणी करण्यासाठी गोठय़ावर गेले असता हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून गोर्हय़ाला ठार मारल्याचे दिसून आले. राजनकर यांनी वन विभागाला माहिती दिल्यानंतर वनपाल के. डी. सरनाईक यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत पंचनामा केला. यावेळी वन विभागाला बिबट्याच्या अस्तित्वाचे पुरावे सापडल्याचे निष्पन्न झाले. परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून, मागील १८ दिवसांपूर्वी (२८ डिसेंबर) येथील समाधान पोफळे यांच्या गोठय़ावर बिबट्य़ाने रात्री हल्ला करून एक गोर्हा व तीन कुत्र्यांचा फडशा पाडला होता. यावेळी एक गाय गंभीर जखमी होऊन बिबट्य़ाच्या तावडीतून वाचली होती.
१४ जानेवारीच्या रात्री पुन्हा बिबट्याने एका गोर्हय़ाचे लचके तोडून ठार मारल्याने शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परिसरातील शेतकर्यांना सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. रात्रीच्या वेळी शेतकर्यांनी समूहाने जावे व जातेवेळी हातात काठी, टॉर्चसोबत ठेवून हिंस्त्र प्राण्यांना पळविण्यासाठी शेत शिवारात फटाके फोडावे, अशी मागणी होत आहे.