सोने-चांदीची उलाढाल कोटींच्या घरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:01 AM2017-10-17T01:01:36+5:302017-10-17T01:02:10+5:30

दीपावलीनिमित्त सराफा बाजारात झगमगाट दिसून ये त आहे. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सराफा बाजारात ग्राहकांची  गर्दी वाढली असून, बुलडाणा शहरातील सोने-चांदीची उलाढाल  कोंटीच्या घरात पोहोचली आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि  भाऊबीजेचा मुहूर्त साधून सोने आणि चांदीची मागणी दुपटीने  वाढण्याचे संकेत आहेत. 

Gold and silver turnover in crores of rupees! | सोने-चांदीची उलाढाल कोटींच्या घरात!

सोने-चांदीची उलाढाल कोटींच्या घरात!

Next
ठळक मुद्देसराफा बाजारात झगमगाट धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला वाढली खरेदी 

ब्रह्मनंद जाधव । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दीपावलीनिमित्त सराफा बाजारात झगमगाट दिसून ये त आहे. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सराफा बाजारात ग्राहकांची  गर्दी वाढली असून, बुलडाणा शहरातील सोने-चांदीची उलाढाल  कोंटीच्या घरात पोहोचली आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि  भाऊबीजेचा मुहूर्त साधून सोने आणि चांदीची मागणी दुपटीने  वाढण्याचे संकेत आहेत. 
दीपावलीनिमित्त बुलडाणा शहरातील बाजारपेठ गेल्या १५  दिवसांपासून फुलली आहे. पणत्या, आकाश कंदिल यांसारख्या  छोट्या व महत्त्वाच्या वस्तुंपासून सोने-चांदीच्या दागिन्यापर्यंत  सर्वच बाजारात झगमगाट दिसून येत आहे. सोने आणि चांदी  खरेदीकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. नोटाबंदी व त्यानंतर  जीएसटीपासून सराफा बाजारातील दररोजच्या उलाढालीवर  परिणाम जाणवत आहे. सराफा बाजार दिवसाकाठी होणार्‍या  भावातील चढ-उतारावर आधारित असते. त्याचबरोबर  दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणांसाठी सोने-चांदी खरेदीची परं परा कायम असल्याने दिवाळीचा काळ सराफा बाजारासाठी   सुवर्णकाळ मानल्या जातो.  यावर्षी धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला  बुलडाणा शहरातील सराफा बाजारात मोठय़ा प्रमाणावर गर्दी  दिसून आली. बुलडाणा शहरातील सराफा बाजारातील उलाढाल  कोटींच्या घरात गेली असून, सकाळी ९ वाजेपासून रात्री ११  वाजेपर्यंत दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. यावर्षी १७ ऑ क्टोबर रोजी धनयत्रोदशी, १९ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन  आणि २१ ऑक्टोबर रोजी भाऊबीज या दिवशी बाजारपेठेतील  उलाढाल दुप्पटीने वाढणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. 
दिवाळीत चांदीच्या वस्तूंना जास्त मागणी असते. त्यामुळे  धनत्रयोदशीच्या पार्श्‍वभूमीवर सोन्यासोबतच चांदीची  मागणीदेखील वाढली आहे. दिवाळीत भेटवस्तुंसह शिक्के,  नोटा, गणेश, लक्ष्मी मूर्ती, समई, दिवा, पूजा प्लेट, निरंजन,  वाटी, करंडा, लक्ष्मीयंत्र, गदा, तलवार, गुलाबदाणी, अत्तरपेटी  आदी वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. लक्ष्मी  पूजनाच्यावेळी  पूजेसाठी चांदीच्या लक्ष्मीची मागणीसुद्धा वाढली  आहे. यात चांदीच्या लक्ष्मीच्या लहान-मोठय़ा मूर्ती दुकानांमध्ये  उपलब्ध आहेत. 

सोन्याचे भाव ३ हजार २00 रुपयांवर
बुलडाणा शहरातील सराफा बाजारामध्ये सध्या सोन्याचे भाव ३  हजार २00 रुपये ग्रॅमवर पोहोचले आहेत; मात्र सोन्याच्या वाढ त्या भावाची पर्वा न करता ग्राहक सोने खरेदी करताना दिसून येत  आहेत. भाव वाढलेले असले तरी नोटाबंदी व जीएसटीनंतर  पहिल्यांदाच सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढलेली आहे.  त्यामुळे या दिवाळीला सराफा बाजारातील उलाढाल मोठय़ा  प्रमाणावर वाढणार आहे. 

स्टॉलच्या माध्यमातून आठ कोटींची उलाढाल
बुलडाणा शहरात सोने-चांदीच्या दुकानांसह विविध प्रकारचे  स्टॉल गेल्या पंधरा दिवसांपासून लावण्यात येत आहेत. शहरात  विविध ठिकाणी लागलेल्या सोने-चांदीच्या स्टॉलमध्ये आकर्षक  दागिणे उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शहरातील सोने- चांदीच्या स्टॉलवर जवळपास आठ कोटींची उलाढाल झाल्याची  माहिती आहे. 

शेतकर्‍यांचाही सोने खरेदीकडे कल
जिल्ह्यात मूग, उडीद या पिकांपाठोपाठ सोयाबीनही घरात  आलेले आहे. सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम शेवटच्या ट प्प्यात आला असून, अनेकांचा शेतमाल घरात आला आहे. शे तमाल विक्रीनंतर मोठे कास्तकार सोने खरेदीला पसंती दर्शवत  आहेत. बँकेत पैसे न टाकता अनेक मोठे कास्तकार या  दिवाळीला सोने खरेदीच्या गुंतवणुकीकडे वळलेले दिसून येत  आहेत. सराफा बाजारामध्ये शहरातील नोकरदार वर्गच नाही तर  ग्रामीण भागातील मोठे कास्तकारही सोने खरेदीसाठी गर्दी करत  आहेत. 

Web Title: Gold and silver turnover in crores of rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं