इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये जळगावच्या विद्यार्थ्यांला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 07:27 PM2021-12-27T19:27:47+5:302021-12-27T19:28:00+5:30
International Science Olympiad : या ऑलिम्पियाडमध्ये 59 देशातील 324 विद्यार्थी सहभागी झाले होते.
ref='https://www.lokmat.com/topics/jalgaon-jamod/'>जळगाव जामोद : दुबई येथे पार पडलेल्या अठराव्या इंटरनॅशनल ज्युनिअर सायन्स ऑलिम्पियाडमध्ये जळगावच्या देवेश पंकज भैया या विद्यार्थ्याने देशाचे प्रतिनिधित्व करीत सुवर्णपदक पटकाविले. यासाठी देशातून सहा विद्यार्थ्यांची निवड झाली होती. महाराष्ट्रातून देवेश हा एकमेव विद्यार्थी होता. याकरिता लाखो विद्यार्थ्यांमधून अंतिम 35 विद्यार्थी आणि या 35 विद्यार्थ्यांमधून सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे या सहाही विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल सायन्स ओलंपियाड मध्ये सुवर्णपदक मिळविले. या ऑलिम्पियाडमध्ये 59 देशातील 324 विद्यार्थी सहभागी झाले होते. देवेश हा नवलकिशोर भैया व उषादेवी भैया यांचा नातू असून आर्किटेक पंकज भैया व इंटेरियर डिझायनर पल्लवी भैया यांचा मुलगा आहे .या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे