सुवर्णपदक विजेत्या हर्षदाचा औरंगाबादेत सत्कार

By admin | Published: September 26, 2016 02:30 AM2016-09-26T02:30:09+5:302016-09-26T02:30:09+5:30

संज्युनियर विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणा-या हर्षदाचे अंभोरे यांनी स्वीकारले पालकत्व.

Gold medal winner Harshadacha Aurangabad felicitated | सुवर्णपदक विजेत्या हर्षदाचा औरंगाबादेत सत्कार

सुवर्णपदक विजेत्या हर्षदाचा औरंगाबादेत सत्कार

Next

अशरफ पटेल
देऊळगावराजा (जि. बुलडाणा), दि. २५- अझरबैजानमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनियर विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणार्‍या हर्षदा निठवेचा औरंगाबाद येथे स्थानिक आदिशक्ती ग्रुप, संतोषभाऊ मित्रमंडळ व मातृतीर्थ पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याचवेळी संतोष अंभोरे यांनी तिचे ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पालकत्व स्वीकारून आर्थिक मदत दिली.
हर्षदाने सुवणपदक पटकाविल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत उपरोक्त संघटनांनी तिचा पुढील आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यात सत्कार आयोजित केला आहे.
देऊळगावमही येथील अत्यंत गरीब निठवे कुटुंबातील हर्षदाने आयएसएसएफ ज्युनियर विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देताना चमकदार कामगिरीची नोंद केली होती. याबाबत २४ सप्टेंबर रोजी ह्यमॉ जिजाऊच्या लेकीची सुवर्ण भरारीह्ण असे ह्यलोकमतह्णमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तिच्या मदतीसाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. सन २0२0 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेचे लक्ष्य हर्षदाने ठेवले असून, त्यासाठी तिला मदतीची आवश्यकता आहे. हर्षदा सध्या शुटिंग रेंजचा सराव एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम आणि संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. येणार्‍या काळात २५ मीटर शुटिंग रेंजमध्ये चार लाखांपेक्षा जास्त खर्च येत असल्याने तिला मदतीची गरज आहे. हरियाणा आणि दिल्ली या दोन्ही राज्यांतून तिला सर्व सुविधा देऊन त्यांच्या संघाकडून खेळण्याचे निमंत्रण देण्यात आले; मात्र तिने नकार देत केवळ महाराष्ट्रासाठीच खेळणार असल्याचा निश्‍चय केला आहे.

Web Title: Gold medal winner Harshadacha Aurangabad felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.