महसूल प्रशासनाच्या वतीने सुवर्ण राजस्व अभियान राबवावे : ज्ञानेश्वर टाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:37 AM2021-08-27T04:37:46+5:302021-08-27T04:37:46+5:30
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेहकर तहसील अंतर्गत महसूल विभागाच्या वतीने पुरवठा विभागातील बऱ्याच योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याच्या ...
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेहकर तहसील अंतर्गत महसूल विभागाच्या वतीने पुरवठा विभागातील बऱ्याच योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातील सर्व गावातील नागरिकांच्या वतीने प्राप्त होत असून, बऱ्याच नागरिकांनी अर्ज करूनसुद्धा त्यांना दोन वर्षे होत आहे. रेशन कार्ड मिळत नाही व ज्यांना कार्ड मिळाले आहे; परंतु त्यांचे बारा अंकी नंबर त्यांना देण्यात आलेला नाही. बऱ्याच नागरिकांचे रेशन कार्ड ऑपरेटर यांनी ऑनलाइन केलेले नाही. तालुक्याला इष्टांक शिल्लक असतानादेखील बऱ्याच लाभार्थींना वंचित ठेवले जात आहे. पुरवठा विभागातील कार्यालयातील नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना धान्य मिळत नसून शासनाच्या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तब्बल दोन वर्षे झाले सदर अभियान राबवले गेलेले नाही. तरी आपण आपल्या स्तरावर तात्काळ उचित कार्यवाही करावी. महाराष्ट्र शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत संबंधित योजना ह्या ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात व योग्य ती नियमानुसार कार्यवाही करावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल, असा इशारा देण्यात आला. सदर निवेदनाच्या प्रति पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व विभागीय आयुक्त अमरावती यांना सादर करण्यात आल्या. यावेळी देवेंद्र आखाडे, कृषांक चव्हाण उपस्थित होते.