गोरेगाव ते उमनगाव रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार- पालकमंत्री डॉ. शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:41 AM2021-09-10T04:41:58+5:302021-09-10T04:41:58+5:30
७ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा मतदारसंघातील काही गावांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ...
७ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा मतदारसंघातील काही गावांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी साखरखेर्डा येथे शिंदी, पिंपळगाव सोनारा, मोहाडी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी उमनगाव येथे परमेश्वर शेरे पाटील यांनी आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमाला हजेरी लावली. सत्कार, भाषण बंद करून मारोतीच्या मंदिरात उमनगाव, गोरेगाव, काटेपांग्री, बाळसमुद्र येथील नागरिकांना समस्या मांडण्याचे सांगितले. उमनगाव ते गोरेगाव रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे आणि नाल्यावरील रपट्याऐवजी पूल तयार करण्यात यावा. त्याच बरोबर जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करण्यासाठी निधी देण्यात यावा. पालकमंत्री पाणंद रस्ते तयार करण्यात यावी. इत्यादी कामाचे निवेदन यावेळी ग्रामस्थांनी दिले. ही कामे येत्या वर्षात मार्गी लावणार असल्याची ग्वाही मंत्रिमहोदयांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राम जाधव, जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव देशमुख, नितीन शिंगणे, संजय पंचाळ, गोरेगावचे सरपंच रामदास पंचाळ, कमलाकर गवई, सरपंच दाऊत कुरेशी, सय्यद रफिक, राजू शिंगणे, नकुल शिंगणे, रामदाससिंग राजपूत, विनायक गायकी, माधवराव जाधव, सुभाष गवई, आर. सी. गवई यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.