विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत सरकार सदैव तत्पर : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:40 AM2021-07-14T04:40:05+5:302021-07-14T04:40:05+5:30
विद्यार्थी (शालेय आणि महाविद्यालयीन) नियमित शाळा व महाविद्यालय सुरू नसल्यामुळे शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल होत आहेत. त्यांचा शैक्षणिक ...
विद्यार्थी (शालेय आणि महाविद्यालयीन) नियमित शाळा व महाविद्यालय सुरू नसल्यामुळे शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल होत आहेत. त्यांचा शैक्षणिक व बौद्धिक स्तर खालावत आहे. मुख्यत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गावे व शहरात नियमित शाळा व महाविद्यालये त्वरित संपूर्ण विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत सुरू करण्यात यावीत. यानुषंगाने विद्यार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण करण्यात यावे. त्यासाठी ग्रामीण भागातील महाविद्यालय, शाळा तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यात याव्यात, आर्थिक मागास घटकातील प्रत्येकाला ऑनलाईन शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी, अथवा दर्जेदार उपकरणे पुरवावीत. विविध विभागातील तृतीय व चतुर्थी श्रेणीतील पदे त्वरित भरण्यात यावीत, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी युवासेनेच्या वतीने उपतालुका प्रमुख विशाल इंगळे यांनी मंत्री सामंत यांना सादर केले. यावेळी आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शाळा तांत्रिकदृष्ट्या असक्षम
ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाची सांगड शैक्षणिक क्षेत्रात अत्यावश्यक बाब म्हणून पुढे आली आहे. परंतु, ग्रामीण भागातील शाळा, विद्यालय तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम नाहीत, असा प्रश्नही यावेळी युवासेनेच्या वतीने निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला.